USIEF Fellowship : अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी USIEF फेलोशिप; जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल...
USIEF Fellowship ची अर्ज प्रक्रिया पुढील महिन्यात सुरु होणार असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन USIEF चे सीनियर प्रोग्राम ऑफीसर डॉ. सुदर्शन दास यांनी केले.
USIEF Fellowship : अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी USIEF Fellowship उपलब्ध असून विद्यार्थ्यांसह नोकरी करणारे कर्मचारी, संशोधन करणाऱ्यांसाठी रिसर्च फोलोशिप, पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप तसेच एक्सिलेन्स फेलोशिप उपलब्ध आहे. याची अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे सीनियर प्रोग्राम ऑफीसर डॉ. सुदर्शन दास यांनी केले.
'युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन' (USIEF) फेलोशिपबद्दल NGO प्रतिनिधींसाठी साठी नागपूर महानगरपालिकेत आयोजित कार्यशाळेत ते बोलते होते. परदेशात शिक्षण प्राप्त करून त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या देशात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी शिक्षणासाठी पुढे आलेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी 'युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन' (USIEF) फेलोशिप ही एक उत्तम संधी आहे. याबद्दल विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना माहिती मिळावी, या उद्देशाने मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मनपा मुख्यल्यातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सभा कक्षात करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती www.usief.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहिती हवी असल्यास ip@usief.org.in येथे संपर्क साधला येईल.
स्वयंसेवी संस्थांनी जाणून घेतले फेलोशिपबद्दल...
कार्यशाळेत एचसीएल फाउंडेशन, एलएफई फाउंडेशन, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन, मासूम फाउंडेशन, मेलीओल फाउंडेशन, उपाय फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन, आरोह फाउंडेशन, स्वच्छ असोसिएशन अँड टू गेदर वी कॅन, अग्रेसर फाउंडेशन, एन्व्हायरमेंट फाउंडेशन, प्रयास फाउंडेशन, जीवन विद्या फाउंडेशन यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोलोशिपचा लाभ कोणाला?
युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे श्री. सुदर्शन दास यांनी USIEF द्वारे फुलब्राईट – नेहरु आणि डॉ. कलाम यांच्या नावाने दिल्याजाणाऱ्या विविध फेलोशिप बद्दल माहिती देत त्याकरिता अर्ज कस करावा, अर्जात कुठले विशेष मुद्दे नमूद करावे, आदी विषयांची माहिती दिली. श्री. सुदर्शन दास यांनी USIEF बद्दल सांगितले की, अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी 'युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन' द्वारे फेलोशिप दिल्या जाते. फुलब्राइट प्रोग्राम हा आता जगातील सर्वात मोठा शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. जो अमेरिका (यूएस) सह 160 हून अधिक देशांदरम्यान कार्यरत आहे. याद्वारे आजवर 20 हजार भारतीयांना फेलोशिप आणि अनुदाने प्रदान करण्यात आले आहे.
ही बातमी देखील वाचा...
नागपूरमधील संविधान चौकात विदर्भवाद्यांचे राज्य सरकारविरोधात थाळी-फळी आंदोलन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI