एक्स्प्लोर

शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार? चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात

एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे.

 नवी दिल्ली : दसरा मेळाव्याची (Dasara Melava)  लढाई संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई आता जवळ येऊन ठेपलीय. शिवसेनेच्या (Shivsena)  धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज कायदेशीर लढाई बाबत वकिलांसोबत महत्त्वाची बैठक आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीत विचार होणार आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे. जवळपास सहा ते सात लाख अॅफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केस सुरू असताना  चिन्हाबाबात निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. या दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे. कारण चिन्हाबाबत केस आयोगाच्या दारात पोहचल्यानंतर लगेच निवडणुका असतील तर अनेकदा चिन्ह तात्पुरतं गोठवलं गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या केसमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होतेय का हे पाहावं लागेल. आज ठाकरे गटाकडून काय बाजू सादर होते यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे.  

 चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे.तर शिंदे गटाचा दावा आहे की,  विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे.लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Jalgaon News : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी राहणार की जाणार? निवडणूक आयोग आणि राज्यपाल काय भूमिका घेणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget