एक्स्प्लोर

Thackeray Vs Shinde : चिन्हाच्या लढाईत 7 ऑक्टोबर ही तारीख निर्णायक, दोन्ही बाजूंना कागदपत्रं सादर करावी लागणार

Thackeray Vs Shinde : अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णयाची डेडलाईनही जवळ आली. आता तर ज्या दिवशी निवडणुकीचं नोटिफिकेशन निघतंय, त्याच तारखेपर्यंत आयोगानं दोन्ही बाजूंना आपापली कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Thackeray Vs Shinde : एकीकडे पोटनिवडणूक जाहीर आणि दुसरीकडे चिन्हाची लढाई जोरात. ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) लढाईत आता 7 ऑक्टोबर ही तारीख निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडायला सांगितलं आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस चिन्हाच्या लढाईत महत्त्वाचे ठरणार आहेत. 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार शिंदे गटाचा आहे की भाजपचा याने काही फरक पडणार नाही. शिंदे गटाने विरोध केल्याने धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळणार का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. चिन्हाची केस आयोगाच्या दारात होईपर्यंत मध्येच निवडणूक जाहीर झाली की अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलं जातं हा आजवरचा इतिहास आहे. पण सध्याच्या केसमध्ये दोन्ही गटाचा दावा वेगवेगळा आहे. 

पोटनिवडणूक जाहीर, धनुष्यबाणाचं काय?

- ठाकरे गटाचा दावा-चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाचीच स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. 

- शिंदे गटाचा दावा- तर शिंदे गटाचं म्हणणं आहे की विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. 

- 7 तारीख का महत्त्वाची- आता या लढाईत 7 तारीख ही दोन अर्थांनी महत्त्वाची आहे. 7 तारखेलाच पोटनिवडणुकीचं नोटिफिकेशन निघतंय. म्हणजे त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी आयोगातली कागदपत्रं सादर करण्याची मुदत. त्यामुळे चिन्हाबाबत काही निर्णय होऊ शकेल का याची उत्सुकता आहे. 

शिंदे गटाची कागदपत्रं आधी आम्हाला मिळावीत या ठाकरे गटाच्या मागणीवर आयोगाने शिंदे गटालाही नोटीस बजावली आहे. 7 तारखेपर्यंत आणखी सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासही सांगितलं आहे. शिवाय ठाकरे गटही आपली प्राथमिक कागदपत्रं 7 तारखेपर्यंत आयोगात देणार असल्याची माहिती आहे. 

आता बघावं लागेल की या प्राथमिक कागदपत्रांवरच निवडणूक आयोग चिन्हाबाबत काही तात्पुरता निर्णय घेऊ शकतंय का... कारण भलीमोठी कागदपत्रं असल्याने ती तपासण्यात वेळ तर बराच लागणार. तोपर्यंत एखादा तात्पुरता निर्णय तर आयोगाला करावाच लागणार आहे. फक्त हा निर्णय एकदा केल्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत तो कायमच राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने धनुष्यबाण एका गटाला मिळतं की गोठवलं जातं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget