एक्स्प्लोर

Jalgaon News : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी राहणार की जाणार? निवडणूक आयोग आणि राज्यपाल काय भूमिका घेणार?

Jalgaon News : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी जाणार की राहणार अशा चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात रंगू लागली आहे. सुप्रीम कोर्टानेही जातप्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील आमदार लता सोनवणे (Lata Sonawane) यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी निवडणूक आयोग आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अर्ज केला आहे. लता सोनवणे यांना अपात्र ठरवून लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी जगदीश वळवी यांनी अर्जात केली आहे. त्यामुळे चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी जाणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. लता सोनवणे या शिंदे गटातील आमदार आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेत उद्धव ठाकरे समर्थक असताना आमदार लता सोनवणे धनुष्यबाण या चिन्हावर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या. आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी आणि अर्जुनसिंह दिवाणसिंह वसावे यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार इथल्या जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. या निर्णयाविरोधात आमदार लता सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने याबाबत चौकशी करुन निर्णय घेण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते. समितीने पूर्वीचा निर्णय दिल्याने आमदार सोनवणे पुन्हा खंडपीठात गेल्या होत्या. मात्र खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.  यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात 9 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. ऋषिकेश रॉय यांनी आमदार लता सोनवणे यांचं टोकरे कोळी अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला. 

याचिका सर्वोच्च न्यायालयात पुन्हा री-ओपन करण्यासाठी प्रयत्न करणार : माजी आमदार चंद्रकांत सोनवणे
दरम्यान आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. यावर लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बाजू स्पष्ट केली आहे. आमदारकी कुठेही गेलेली नाही. आमदारकी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका डीसमिस केली आहे. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात ती पुन्हा री-ओपन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार डायरेक्ट अशी आमदारकी जात नाही, त्याची कायदेशीर प्रक्रिया असल्याचेही आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी स्पष्ट केलं.

आमदार लता सोनवणेंना अपात्र करा, माजी आमदाराचा राज्यपाल, निवडणूक आयोगाला अर्ज
आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल कामय ठेवला आहे. अपात्र करण्यासंदर्भातली प्रक्रिया ही प्रशासनाची आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग आणि प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार तसंच राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी केली आहे. तसंच याप्रकरणात आमदार लता सोनवणे यांना कलम 191 आणि कलम 192अन्वये अपात्र करण्याच्या मागणीसाठी तीन ते चार दिवसांपूर्वी जगदीशचंद्र वळवी यांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना अर्ज केला आहे. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार दोन नंबरचा जो पक्ष म्हणून मला विजयी करा, अशी मागणी केली असल्याचे जगदीशचंद्र वळवी यांनी सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget