Eknath shinde : आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जातंय; विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर
आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार दारी जातंय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिलं आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात अतोनात खर्च केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
Eknath shinde : आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जातंय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिलं आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात अतोनात खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमांवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत.
राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत. त्यामुळे नागरिकांचादेखील या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद आहे. या कार्यक्रमात वाटत असलेले साहित्य आणि दाखले आपण बघतो आहोत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी वायफळ खर्च होत नाही आहे. उलट नागरिकांना याचा फायदाच होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
'आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे'
एका जाहिरातीमुळे आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होत नाही आहे. आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे. आमची युती आजची नाही तर फार जुनी आहे. या युतीत जो खडा ठरला होता. त्या खड्याला आम्ही बाहेर काढलं आहे. त्यामुळे माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या जाहिरातीमुळे कोणताही वितुष्ट निर्माण झाला नाही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमची युती कधीच तुटणार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यात नागरिकांना विविध योजना आणि सेवांचे 2 लाख 86 हजार लाभ वितरित
‘शासन आपल्या दारी’ अभियानात जोरदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत शासनाच्या विविध योजना आणि सेवांचे 2 लाख 86 हजार 278 लाभ नागरिकांना वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील या अभियानात सहभाग घेतला आहे. जिल्ह्याने उत्तम नियोजनाच्या माध्यमातून 31 मे रोजी एकाच दिवशी नागरिकांना 1 लाख 81 हजार विविध योजना व सेवांचा लाभ दिला होता. या कामगिरीत सातत्य ठेवत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तालुकास्तरावर विविध ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कृषि, महिला व बालविकास, पंचायत समिती, पशुसंवर्धन, महसूल, महानगरपालिका, नगरपालिका, निवडणूक शाखा, शिक्षण विभाग, मनरेगा आदी विविध विभागांनी या मेळाव्यांमध्ये सहभाग घेतला.