एक्स्प्लोर

Eknath Shinde : 'याआधीही हरले, आता तर मोदींची गॅरंटी, ते पुन्हा हरणार'; मुख्यमंत्री शिंदेंचे मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर

CM Eknath Shinde : संविधानाला धरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम मोदीजी करत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde on Mallikarjun Kharge : भाजप (BJP) देशातील संविधान नष्ट करण्याचे काम करत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संविधान सुरक्षित असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांचेच खासदार संविधान (Constitution) बदलण्याची भाषा करत आहेत अशी टीका काँग्रेसची राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. या टीकेवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर दिले आहे. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी लिहिलेलं संविधान आहे. संविधानाला धरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम मोदीजी करत आहेत. 80 कोटी जनतेला मोफत अन्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिलं आहे. 

त्यामुळे ते परत हरणार - एकनाथ शिंदे 

काँग्रेस किंवा आघाडीकडून खोटे आरोप करून बदनाम करण्याचे काम केले जात आहे. याच संविधानाला धरून देशाचा व राज्याचा कारभार होतं आहे. त्यांना पराभव समोर दिसत असल्याने, ते अशी वक्तव्य करत आहेत. २०१४ ला आरोप केले होते तेव्हा ते हरले. २०१९ ला आरोप केले तेव्हाही हरले. आता तर मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे ते परत हरणार, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे. 

नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे? 

पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांनी पक्षातून बाहेर काढावे. भाजप नेहमीच सामाजिक न्यायाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. आरएसएस आणि मोहन भागवत देशातून आरक्षण आणि संविधान संपवण्याचे काम करत आहेत. भारताच्या तिरंग्याला आरएसएस भगव्या झेंड्यासमोर  फारसे महत्त्व देत नाही. देशाचे संविधान बदलण्यासाठी मोदीजी 400 पारचा नारा देत आहात का?' 'कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात मोठा गदारोळ होईल, अशा प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. 

मोदी सरकार आपली काळी कृत्ये लपवण्याचा प्रयत्न करतंय

पंतप्रधान आजकाल हिंदी सोडून प्रादेशिक भाषेत बोलून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने देशाची राज्यघटना पूर्णपणे स्वीकारली नाही, हे खेदजनक आहे. एसबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे एलेक्टोरल बाँड्सप्रकरणात वेळ मागितला आहे. मोदी सरकार आपली काळी कृत्ये लपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे यावरून स्पष्ट होते. सरकारला निवडणुकीपर्यंत सत्य लपवायचे असल्याची टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती. 

आणखी वाचा 

Vasant More Resignation : मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Embed widget