अॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
Nirmit Parikh Success Story : मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निर्मित पारेख यांची यशाची कहाणी अत्यंत रंजक आहे.

Nirmit Parikh Success Story : वयाच्या ७ व्या वर्षी डिजिटल घड्याळ बनवून रोबोटिक्सच्या दुनियेत पाऊल ठेवणे. अॅपलसारख्या (Apple) कंपनीत उच्च पदावर काम करून स्वत: बिझनेसमन होण्यासाठी आलिशान नोकरीला लाथ मारून 'अपना'च्या (Apna App) माध्यमातून तब्बल 9100 कोटींची कंपनी उभारणे, अशी अत्यंत रंजक कहाणी मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निर्मित पारेख (Nirmit Parikh ) यांची आहे. जाणून घेऊयात त्यांच्या वाटचालीबाबत...
निर्मित पारेख यांना बालवयातच तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली होती. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी रोबोटिक्स प्रोग्रामिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी टेकचे शिक्षणही घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी इंकॉन टेक्नॉलॉजीज नावाचे स्टार्टअप सुरू केले होते. हे स्टार्टअप पूर व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांवर काम करत होते. B.Tech केल्यानंतर त्यांनी क्रक्सबॉक्स नावाची दुसरी कंपनी देखील सुरू केली होती. त्यानंतर त्यांचे स्टार्टअप इंटेलले खरेदी केले होते. तसेच इंटेलने त्यांना नोकरीची संधी देखील दिली होती. ते इंटेलमध्ये डेटा अॅनालिटिक्सच्या संचालकपदापर्यंत पोहोचले होते. तर दुसरीकडे त्यांनी एमबीएचे शिक्षण देखील घेतले.
अॅपलची नोकरी सोडून 'अपना' अॅपची सुरुवात
एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंटेलची नोकरी सोडून अॅपलमध्ये नोकरी केली. अॅपलमध्ये मोठ्या वेतनाची नोकरी सोडली नोकरी करत असताना असंघटित ब्लू कॉलर क्षेत्रामध्ये कामगार आणि मालक यांना जोडण्यासाठी कोणतंही व्यासपीठ नाही, हे निर्माण यांच्या लक्षात आले. यामुळे जिथे लोकांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत, तिथे कंपन्यांना देखील कर्मचारी मिळत नाहीत ही पोकळी त्यांना समजली. यानंतर त्यांनी अॅपलची नोकरी सोडून निर्मित पारेख यांनी 2019 साली'अपना' अॅपची सुरुवात केली.
लाखो लोकांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ
'अपना' ही कंपनी अवघ्या काही वर्षात युनिकॉर्न बनली. आज अपनाचे मूल्यांकन 9100 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या अॅपवर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. यामध्ये अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट, अशा मोठ्या ब्रँड्सचा समावेश असून ही कंपनी लाखो लोकांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























