![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vasant More Resignation : मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!
Vasant More Resignation : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
![Vasant More Resignation : मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र! Vasant More Resignation Vasant More resigns Pune MNS leader Vasant More Resign left party before Lok Sabha Election 2024 major setback to Raj Thackeray Maharashtra news Vasant More Resignation : मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/12/463b1834259d3f44146b03cf5f1afe2d1710229671621442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा (Vasant More MNS) निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) राजीनामा दिला आहे. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला राम राम केल्याने राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांंपासून रंगली होती. त्यातच त्यांनी अनेक खदखददेखील व्यक्त केली होती. त्यांनी आज सकाळीच 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो', अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे
Vasant More Resignation : पत्रात नेमकं काय लिहिलंय?
प्रति,
मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.
आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।
पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे 'तर अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती.
धन्यवाद ।
आपूज्य विश्वास
Vasant More Resignation; शरद पवारांना साथ देतील?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)