Donald Trump on Tesla : राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
Donald Trump on Tesla : फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी विशेषत: आयात केलेल्या कारवरील भारताच्या उच्च शुल्काचा उल्लेख केला. या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चाही केली होती.

Donald Trump on Tesla : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वक्तव्यांमुळे भारताची धास्ती वाढतच चालली आहे. त्यांची अलीकडील सर्व विधाने भारताला अत्यंत अस्वस्थ करणारी आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आता टेस्लाच्या भारतात प्रवेशाची चिंता लागली आहे. एलॉन मस्क यांनी भारतात कारखाना काढला तर तो अमेरिकेवर अन्याय होईल, असे त्यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी विशेषत: आयात केलेल्या कारवरील भारताच्या उच्च शुल्काचा उल्लेख केला. या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चाही केली होती. दोन्ही नेत्यांनी शक्य तितक्या लवकर व्यापार कराराच्या दिशेने काम करण्यास सहमती दर्शवली असली तरी, दरांवरील त्यांचा विरोध अद्याप निराकरण झालेलं नाही. ट्रम्प म्हणाले, "जगातील प्रत्येक देश आमचा फायदा घेतो आणि ते टॅरिफद्वारे तसे करतात. उदाहरणार्थ, भारतात कार विकणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे."
पण ते आमच्यासाठी चुकीचे आहे
या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, मस्क यांना भारतात कारखाना उभारण्याचा अधिकार आहे, परंतु अशा पावलांमुळे अमेरिकेचे नुकसान होईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ट्रम्प म्हणाले, "आता त्यांनी भारतात कारखाना बांधला तर ते ठीक होईल, पण ते आमच्यासाठी चुकीचे आहे. ते खूप चुकीचे आहे." यापूर्वी भारतात मतदानात वाढ होण्यासाठी यूएस सरकारच्या कार्यक्षमता विभाग (DOGE) ने दिलेला $21 दशलक्ष निधी रद्द करण्यात आला होता. या मुद्द्यावर देखील ट्रम्प म्हणाले होते की ते म्हणाले की भारताकडे आधीच खूप पैसा आहे आणि तो जगातील सर्वाधिक कर गोळा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेला भारतासोबत व्यापार करणे कठीण जात आहे कारण तेथील शुल्क खूप जास्त आहे. आता टेस्ला सुद्धा कडाडून विरोध केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह त्यांच्या प्रमुख व्यापारी भागीदारांवर जशास तसे शुल्क जाहीर केले आहे, जे अमेरिकेतून पाठवलेल्या वस्तूंवर उच्च आयात शुल्क लादतात, त्यांना त्याच पद्धतीने कर लावण्यास ट्रम्प यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा आधीच केली आहे, जी 12 मार्चपासून लागू होणार आहे. नवीन दर धोरणाची घोषणा करताना राष्ट्रपती म्हणाले की, शुल्काच्या बाबतीत भारत 'सर्वोच्च' आहे कारण हे सर्व देश जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) सदस्य आहेत, अमेरिकेचे निर्णय WTO च्या तत्त्वांना आव्हान देऊ शकतात.
माझ्याशी कोणीही वाद घालूच शकत नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे स्पष्ट केले आहे की अमेरिकेच्या जशास तसे शुल्कातून भारताला कोणतीही सूट दिली जाणार नाही. 'फॉक्स न्यूज'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली. "टेरिफच्या मुद्द्यावर कोणीही माझ्याशी वाद घालू शकत नाही." असे त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले. ट्रम्प म्हणाले की, मी यापूर्वीच मोदींना स्पष्टपणे करातून कोणतीही मिळणार नसल्याचे सांगितलं आहे. या मुद्यावर माझ्याशी कोणीच चर्चा करु शकत नाही. मोदींना इथं असताना मी त्यांना हे सांगितलं होतं, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मोदी यांनी हे पसंत नसल्याचे सांगितले होते. मात्र, मी तुम्ही कर लावणार असाल, तर मी सुद्धा तेच करणार असल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले. मी सर्वच देशांसोबत असं करत आहे. विशेष म्हणजे जशास तसे कर लावण्यावर मोदींच्या भेटीपूर्वी दोन तास आधीच आदेशावर स्वाक्षरी केली होती. फॉक्स न्यूजने मंगळवारी रात्री राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अब्जाधीश मस्क यांची संयुक्त मुलाखत प्रसारित केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
