एक्स्प्लोर
भाजप सोडण्याचा विचार नाही, पण पर्याय काय?: एकनाथ खडसे
मी कोणता गुन्हा केला ते सरकारने जाहीर करावे आणि चूक केली असेल तर शिक्षा द्यावी असे खडसे म्हणाले.
जळगाव: मी 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण पक्षानेच जर दूर केले तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते जळगावात बोलत होते.
जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते.
‘राजकारणात काहीही होऊ शकतं’
यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणातून भाजपला थेट इशारा दिला.
“राजकारणात काहीही होऊ शकतं. मी 40 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षानेच जर दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही. गेल्या 20 महिन्यात मी एकदाही मला मंत्री करा असे पक्षाला म्हटलेले नाही. गेल्या 40 वर्षात एकदाही पक्ष बदल करण्याचा विचार केला नाही. मी कोणता गुन्हा केला ते सरकारने जाहीर करावे आणि चूक केली असेल तर शिक्षा द्यावी” असे खडसे म्हणाले.
तुमच्यासाठी दरवाजे खुले: अशोक चव्हाण
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना जाहीर ऑफर दिली.
खडसे राज्यातील खरा स्वाभिमानी नेता आहे. सत्ता गेली तरी स्वाभिमान जपणारा नेता म्हणजे खडसे. पक्षातून ढकलण्याची वाट पाहू नका. नाथाभाऊ काहीही असो, ‘दोस्त को याद करो’, कोणताही निर्णय घ्या, तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement