Nawab Malik : नवाब मलिकांसाठी कोठडी वाढवून मागितली, आणखी काही पुरावे सापडत असल्याचा ईडीचा दावा
Nawab Malik : ईडीनं नवाब मलिकांसाठी सहा दिवसांची कोठडी वाढवून मागितल्याचे समजते.
Nawab Malik : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत नवाब मलिक सध्या आहेत, यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली असून ईडीनं नवाब मलिकांसाठी सहा दिवसांची कोठडी वाढवून मागितल्याचे समजते. त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
नवाब मलिकांच्या रिमांडवर युक्तिवाद
आज नवाब मलिकांच्या रिमांडवर युक्तिवाद सुरू असून याप्रकरणी ईडीनं कोठडी वाढवून मागितल्याचे समजते. ईडीतर्फे युक्तिवाद करण्यासाठी एएसजी अनिल सिंह पीएमएलए कोर्टात पोहचले होते. ईडीनं याप्रकरणी अन्य काही जबाब नोंदवले आहे. ज्यात आरोपींचे अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याचे पुरावे सापडत असल्याचे ईडीने म्हटलंय. या जबाबाच्या आधारावर मलिकांची पुढची चौकशी कस्टडीतच होणं आवश्यक आहे असं ईडीने म्हटलंय. कोर्टात नवाब मलिक यांच्या दोन्ही मुली सना आणि निलोफर उपस्थित आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणात नवाब मलिकांची चौकशी करायची आहे. 25 फेब्रुवारी ते 28 पर्यंत आम्ही चौकशी करू शकलो नाही. त्यामुळे आणखीन सहा दिवसांची रिमांड आवश्यक असल्याचे ईडीने म्हटलंय.
ईडीचा पीएमएलए कोर्टात दावा
ईडीनं मागितलेल्या रिमांडला विरोध करत नवाब मलिकांतर्फे जेष्ठ वकील अमित देसाईंचा युक्तिवाद सुरू असून तपासयंत्रणेला आम्ही काही माहिती मागितली की, की ते गोपनीयतेचे नियम पुढे करतात. मात्र कोर्टापुढे येण्यासाठी मीडियात केलेल्या तपासाची माहिती लीक केली गेली. नवाब मलिक हे मंत्री आहे म्हणून पुरावे छेडछाड करू शकतात असा दावा केला जातोय
मग मीडियात माहिती कशी काय लीक झाली ?
मलिक यांना बाहेर सोडा, ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत, मात्र ईडीनं चौकशीबाबतची माहिती गुप्त ठेवावी. 25 वर्षांनंतर केवळ राजकिय सूड उगवण्यासाठी आरोप केले जात आहेत. या प्रकरणात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या विधानांवर ईडीचा विश्वास बसतो? बॉम्ब ब्लास्टमध्ये दोषी असलेल्या लोकांचे जवाब घेऊन त्यांना या केसमध्ये साक्षीदार बनवलं जातय. पण त्यांच्या साक्ष किती विश्वासार्ह? हा महत्वाचा प्रश्न आहे. असे अॅड. अमित देसाई म्हणाले. या प्रकरणात 55 लाख रुपये हसीना पारकरला दिले गेले होते असं ईडीनं आधीच्या रिमांडमध्ये म्हटलं होतं. मात्र आज सांगण्यात येतंय की ती टायपिंग मिस्टेक होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha