एक्स्प्लोर
घरी किंवा गडचिरोलीला जायची तयारी आहे, माजी मंत्र्यांना डीवायएसपीचा दणका !
एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे

कोल्हापूर : कोल्हापूरमधील एका पोलीस अधिकाऱ्यावर सध्या मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना या अधिकाऱ्याने दिलेल्या बाणेदार उत्तर देत त्यांची जागाच दाखवून दिली. हा व्हिडीओ सोशल माध्यमात वायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. सुरज गुरव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नव्हता.त्यामुळे बंदोबस्तावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी आमदारद्वयीला महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केला. यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
यावेळी सुरज गुरव यांनी बाणेदारपणे उत्तर देत त्यांना सांगितले की ”एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे’. हा हा व्हिडीओ सोशल माध्यमात वायरल झाला आहे.
गुरव यांनी परवानगी नसताना महापालिकेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांना रोखत तिथून माघारी पाठवले. गुरव यांनी आमदारांच्या दबावासमोर न झुकता स्पष्ट वक्तेपणाची रोखठोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा आणि कौतुक होत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























