एक्स्प्लोर

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या?

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. तसेच यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही उपलब्ध आहे.

चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अशातच पोलिसांनी केलेल्या नगपूरच्या एका फार्मासिस्टच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. तसेच यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही उपलब्ध आहे. डॉ. शीतल आमटे यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. ते काही दिवसांपासून पिसाळल्यासारखे करत होते, त्यामुळे त्यांना देण्यासाठी ही इंजेक्शन्स त्यांनी मागवली होती. 'अॅनेस्थेशिया' श्रेणीतील ही इंजेक्शन्स असून मागवलेल्या 5 इंजेक्शन्सपैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आता या इंजेक्शनवर तपास केंद्रीत केला आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर सासू-सासऱ्यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांली लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. निराशेत असलेल्या मुलीला आमटे कुटुंबाने एकटे सोडल्याचा आरोप करतानाच शीतल आमटे यांच्या सासू-सासऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमटे कुटुंबाने मुला-मुलीत भेद केल्याचा दावा देखील या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. मात्र शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी अशी पोस्ट सुहासिनी आणि शिरीष करजगी यांनी लिहिली असल्याची बाब मान्य केली आहे. सोबतच आम्ही या पोस्टच्या माध्यमातून विचारलेल्या सर्व प्रश्नांवर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र कॅमेरावर कुठल्याही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. सध्या मी माध्यमांशी बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे आणि आता बोलून काय फायदा अशी गौतम करजगी यांनी हतबलता देखील व्यक्त केली आहे. या फेसबुक पोस्टबाबत आमटे कुटुंबियांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप सकारात्मक उत्तर आलेले नाही.

पाहा व्हिडीओ : शीतल आमटेंच्या मोबाईल,लॅपटॉपचे पासवर्ड शोधण्याचं आव्हान,रेटिना पासवर्ड असल्याने अडचणी

डॉ. शीतल आमटे आत्महत्याप्रकरणी तपास योग्य दिशेने, पोलिसांची माहिती

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल निष्कर्ष काढता येईल अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे. फॉरेन्सिक टीम या घटनेचा सखोल तपास करत आहे. आम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. जशी जशी तपासात माहिती समोर येईल आम्ही माहिती देऊ असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे म्हणाले. दरम्यान, सुसाईड नोट मिळाली का? घटने वेळी घरी कोण कोण होते? डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केलेली खोली आतून लॉक होती का? या महत्वाच्या प्रश्नांना पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. आम्ही योग्य दिशेने तपास करतोय असे साळवे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonwane On Santosh Deshmukh | यंत्रणांनी वेळीच पावलं उचलली असती तर देशमुख वाचले असते- बजरंग सोनवणेSantosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंतABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Santosh Deshmukh Case: काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् तो साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् 'तो' साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Embed widget