एक्स्प्लोर
सोलापूरच्या राघवेंद्र नगरमध्ये डीपीचा भीषण स्फोट
सोलापूरच्या राघवेंद्र नगर भागात शनिवारी रात्री डीपीचा मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे मोठा आवाज होऊन आगीचा मोठा लोळ पसरला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोलापूर : सोलापूरच्या राघवेंद्र नगर भागात शनिवारी रात्री डीपीचा मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे मोठा आवाज होऊन आगीचा मोठा लोळ पसरला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. डीपीला आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र, अग्निशमन दल दाखल होताच डीपीचा मोठा स्फोट झाला. वाढत्या उन्हामुळे डीपीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी स्फोटानंतर परिसरात आगीचा मोठा लोळ पसरला होता. या घटनेचं काही स्थानिक लोकांनी या स्फोटाचं मोबाईलमध्ये चित्रण केलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक शहरात तापमानाचा पारा चाळिशी झाला आहे. शनिवारी सोलापुरात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























