एक्स्प्लोर

पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या पाच नव्या प्रजातींचा शोध, भारतीय द्वीपकल्पामधून तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात नोंद

तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात या राज्यांमधे पाच वर्षे सुरु असलेल्या संशोधन मोहीमांच्या शेवटी संशोधकांना सापसुरळांच्या नविन कुळ आणि पाच नविन प्रजातींचा शोध लावण्यात यश आलेले आहे.

मुंबई : 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा (genus) आणि पाच नव्या प्रजातींचा (species) शोध लावण्यात यश आलं आहे. पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद असल्याचं सांगण्यात आलंय.  या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचा सहभाग होता. तसेच जर्मनीमधून प्रकाशीत होणार्‍या 'व्हर्टिब्रेट्स झूलॉजी' या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावरती शिक्कामोर्तब देखील करण्यात आलंय. 

नव्याने शोधलेल्या या कुळाला 'द्रविडोसेप्स' असं नाव देण्यात आलंय. 'द्रविड' या संस्कृत आणि 'सेप्स' या ग्रीक शब्दांवरुन हे नाव ठेवण्यात आलंय. दक्षिण भारतातील आढळक्षेत्रासाठी 'द्रविड' आणि सापसदृश्य ठेवणीसाठी 'सेप्स' यांच्या जोडणीतून कुळाचे नाव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संच्याच्या वेगळेपणावरुन द्रविडोसेप्स हे कुळ सबडोल्युसेप्स या कुळापासून वेगळे करण्यात आले.  द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस,  द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या आढळक्षेत्रावरुन निश्चित करण्यात आले. 

तीन प्रजातींचे वर्गीकरण

यामधील तीन प्रजातींचे वर्गीकरणातील स्थान बदलून ते नव्याने शोधलेल्या कुळामधे निश्चित करण्यात आले. यामध्ये रायोपा गोवाएन्सीस, सबडोल्युसेप्स पृदी आणि सबडोल्युसेप्स निलगीरीएन्सीस यांचा समावेश होता. नव्या कुळात समाविष्ट केलेली द्रविडोसेप्स गोवाएन्सीस ही प्रजात उत्तर गोव्यातील उत्सुम तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (अंबोली) आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली. कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये राधानगरी, पंडिवरे (भुदरगड), तळये (गगनबावडा) आणि वाशी (पन्हाळा) या ठिकाणांवरुन नोंद करण्यात आलीये.  सदरच्या संशोधनामधे सापसुरळ्यांचे 33 ठिकाणांवरुन 89 नमुने गोळा करण्यात आले.

तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात या राज्यांमधे पाच वर्षे सुरु असलेल्या संशोधन मोहीमांच्या शेवटी संशोधकांना नविन कुळ आणि पाच नविन प्रजातींचा शोध लावण्यात यश आलेले आहे. या संशोधनामधे सापसुरळ्यांची शरीरवैशिष्ट्ये, जनुकीय संच, भौगोलिक आढळक्षेत्र आणि या आढळक्षेत्राचा भौगोलिक इतिहास तसेच या प्रजातींच्या उत्क्रांतीचा कालखंड यांचा अभ्यास करण्यात आला. 

भारतामधे सापसुरळ्यांच्या चाळीसहून अधिक प्रजातींची नोंद

सरीसृपांमधे पिल्लांना जन्म देण्याचे समयोजन हे कमी तापमानाच्या अधिवासाशी जोडलेले आहे. कमी तापमानामधे अंडी उबवण्याच्या अडचणींवरील उपाय म्हणून थेट पिल्लांनाच जन्म देण्याचे समयोजन उत्क्रांत झाले असावे असा मतप्रवाह आहे. पण पिल्लांना जन्म घालणार्‍या सरीसृपांच्या सर्वाधिक प्रजाती या  उष्ण कटिबंधीय प्रदेशामधून नोंदवलेल्या आहेत. भारतामधे सापसुरळ्यांच्या चाळीसहून अधिक प्रजातींची नोंद आहे. यातील भारतीय द्वीपकल्पासाठी पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही पहिलीच नोंद आहे. 

ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन सरीसृपांसारख्या दुर्लक्षित जीवांच्या संशोधनासाठी आणि संवर्धनासाठी अविरत प्रयत्न करत आहे. सरीसृपांच्या चाळीसहून अधिक नव्या प्रजातींचा शोध लावण्यास फाउंडेशनच्या संशोधकांना यश आलेले आहे. पिल्लांना जन्म देणार्‍या सापसुरळ्यांवरती प्रकाशित झालेले सदरचे संशोधन या दुर्लक्षित जीवांविषयी कुतुहल वाढवणारे आहे. यातील प्रजातींचे प्रदेशनिष्ठ असणे हे त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित करणारे आहे.

हेही वाचा : 

Pune Shree Ram Rangoli : 40 तास, 50 कलाकारांनी मिळून साकारली 100 फूटाची प्रभू श्रीरामाची रांगोळी; कलाकृती पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget