एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशात जाण्यापूर्वी खाते वाटप जाहीर केलं. खाते वाटपाची यादी राज्यपालांकडून सुपूर्द करुन मुख्यमंत्री परदेशात रवाना झाले. दरम्यान या खाते वाटपात मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना जोरदार धक्का दिला आहे. या दोघांकडील महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतले आहेत.
पंकजा मुंडेकडील जलसंधारण आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्वाची खाती काढून घेण्यात आली आहेत. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला बालकल्याण या खात्यांची जबाबदारी आहे. कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंसोबतच मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनाही धक्का दिला आहे. विनोद तावडेंकडे असणारं वैद्यकीय शिक्षण खातं काढून ते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे.
दरम्यान, पंकजा मुडें यांचं जलसंधारण खातं जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त माझानं दिलं होतं. त्यावर अखेर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement