एक्स्प्लोर
खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी आज खाते वाटप जाहीर केले असून या खाते वाटपात पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्याकडील काही महत्वाची खाती काढून घेण्यात आली आहेत. तर दुसरीकडे काही मंत्र्यांची महत्वाच्या खात्यात वर्णी लागली आहे. पाहा कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं. एक नजर राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपावर: दीपक केसरकर- गृह राज्यमंत्री (ग्रामीण) जयकुमार रावल- रोजगार हमी योजना, पर्यटन गिरीश महाजन- वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा महादेव जानकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (कॅबिनेट) गुलाबराव पाटील- राज्यमंत्री सहकार पाडुंरंग फुंडकर- कृषीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे- उर्जा, उत्पादन शुल्क संभाजी निलंगेकर- कामगार, कौशल्य विकास (कॅबिनेट) सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन, सहकार (कॅबिनेट) अर्जुन खोतकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (राज्यमंत्री) रविंद्र चव्हाण- बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे- जलसंधारण (कॅबिनेट) चंद्रकात पाटील- महसूल आणि सार्वजनिक बांधकाम सदाभाऊ खोत- कृषी आणि पणन (राज्यमंत्री) मदन येरावार - उर्जा व पर्यावरण (राज्यमंत्री)
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र
राजकारण






















