एक्स्प्लोर

सरकारकडून 10-10 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो; सीएम फडणवीसांचा इशारा

फडणवीस म्हणाले की, आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत. त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ. 

Devendra Fadnavis on Cooperative sugar mills criticism: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही दिली. काळजी करू नका आमचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. भरीव मदतीसाठी राज्य सरकार निर्णय करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. लोणीमधील शेतकरी मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले की, कालच अजित दादा मी आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भात आराखडा तयार करणं सुरू केला आहे. फडणवीस म्हणाले की, आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत. त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ. 

एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे

हकारी कारखान्यांचे मालक कारखानदार नसून शेतकरी आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल. साखर कारखान्यांनी नफ्यातून शेतकऱ्यांसाठी मदत निधी बाजूला काढण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांसाठी बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता, तो शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.  एफआरपीतून मागितलं नव्हते, एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही

शेतकऱ्यांचा काटा मारून (वजनामध्ये फसवणूक) कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही, असा आरोपही त्यांनी केला. तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून पैसा जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, जे लोक आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना सांगतो एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा.  आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवला आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यांनी उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून नगर, नाशिक आणि मराठवाड्यापर्यंतचा भाग दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

सहकार मंत्री म्हणून धडाकेबाज निर्णय घेतले

सहकारातले कार्यकर्ते म्हणून अमित शहा यांनी पहिले सहकार मंत्री म्हणून धडाकेबाज निर्णय घेतले आणि महाराष्ट्राला संस्था बळकट करण्यासाठी 8 ते 10 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्यासाठी 8 ते 10 हजार कोटी रुपये अमित भाईंनी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget