एक्स्प्लोर

Ajit Pawar : पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, अमित शाहांकडून वचन; अजित पवार काय-काय म्हणाले?

Ajit Pawar : लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

Ajit Pawar : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) हे शनिवारपासून शिर्डीत मुक्कामी आहेत. काल रात्री शिर्डीत दाखल होताच अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बंद दाराआड महत्त्वाची चर्चा केली. या बैठकीत जवळपास पाऊण तास चर्चा करण्यात आली. या बैठकीचा मुख्य अजेंडा राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यासाठी तातडीने द्यायची मदत असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलंय. 

लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णकृती पुतळ्यांचे अनावरण झाले. तो देखील पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा दुग्धशर्करा योग आहे. 1985 सालापासून साखर कारखान्यांना आयकर लावण्यात येत होता.  मात्र, अमित शाह यांनी तात्काळ प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेतला. 9500 कोटी रुपयांचा कर आपला माफ झाला. लाखो शेतकऱ्यांना आणि कारखान्याला दिलासा मिळाला. चांदा ते बांदा उस जिथे पिकतो तिथे सहकारी साखर कारखाने उभे झाले आणि आर्थिक सुबत्ता यायला लागली. ताकद ओळखायला लावायची आणि सशक्त करायचं हा यामागचा उद्देश होता. 

Ajit Pawar : निवडणुकीच्या वेळी काय राजकारण करायचं आहे ते करा

आम्हाला अमित भाई सांगत आहेत. कमी पाणी, कमी खतात ऊस पीक काढा. एआयचा वापर करा आणि काही मदत लागली तर सांगा.  केंद्र सरकार मदतीला पुढे आलं आहे.  अमित शाह यांनी सांगितलंय की बायप्रोडक्ट संदर्भात देखील मी मदत करतो.  काही कारखाने निवडून आणि प्रोडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करु. साखरेचे भाव 2100 पर्यंत खाली यायचे मात्र कितीही झालं तरी 3300 रुपयांच्या खाली आता साखर विकता येत नाही.  त्याच इथेनॉल आणि बायप्रोडक्टची भर पडते आहे. माझी विनंती आहे की, निवडणुकीच्या वेळी काय राजकारण करायचं आहे ते करा. मात्र नंतर मदत करा आणि हातभार लावा, असे अजित पवार यांनी म्हटले. 

Ajit Pawar : अमित शाहांकडून वचन

अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही सर्व नेते काल अतिवृष्टीसंदर्भात बैठकीला बसलो होतो. पंचनाम्यासंदर्भात देखील लवकर गोष्टी व्हाव्यात हे सांगितले.  सोबतच, अमित शाह यांनी अहवाल लवकर पाठवण्याचे सांगितले आहे, जेणेकरुन मदतीसंदर्भात निर्णय होईल. पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, असे वचन अमित शाह यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा 

Dada Bhuse on Sushma Andhare: सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा कदमांचा हेतू; आता शिवसेनेच्या मंत्र्याने अंधारेंना झापलं; म्हणाले....

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde Beed : '...आरक्षणाचा ठराव घेणारी बीड पहिली जिल्हा परिषद होती'
Pune Fraud Case: 'माझ्या'च्या बातमीचा इम्पॅक्ट, 'मांत्रिक' Deepak Khadke सह तिघांना Nashik मधून अटक
Manoj Jarange : 'मनोज जरांगेंच्या हत्येचा कट', जुना सहकारी Amol Khune सह एकाला अटक!
Maharashtra Politics: 'शिंदे सेनेशी युती नाही' Uddhav Thackeray यांच्या आदेशाला Kankavli त बगल?
Maharashtra Politics'माझ्या हत्येची सुपारी दिली', Manoj Jarange यांचा Dhananjay Munde यांच्यावर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Embed widget