(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : मेट्रो 3 सुरू झाली नाही, तर राज्य सरकारचं अपयशच; मुंबई मेट्रोवरून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
Devendra Fadnavis : मुंबई मेट्रोवरून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका केली तसेच वकिल सतीश उकेंवरील ईडी कारवाईवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis : मुंबईतील मेट्रो (Mumbai Metro 3) लाईन 3 चं 80 टक्के काम पूर्ण झालं असून कारशेडअभावी खोळंबा करण्यात येतोय. मेट्रो 3 सुरू झाली नाही तर हे राज्य सरकारचं (Thackerey Government) अपयशच म्हणावं लागेल, मेट्रो उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई करू नये अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रोवर देत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.
मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल
आमच्या काळात वेगानं काम झालं, आता आमची अपेक्षा अशी आहे की टप्पा 3 चं काम 80 टक्के झालं आहे, मात्र, कारशेड न मिळाल्यामुळे चार वर्षे ही लाइन सुरू होणार नाही, जर आरे कारशेड मिळाले तर आठ महिन्यात लाईन सुरू होईल, त्यामुळं श्रेय घेता घेता हे अपश्रेय सुद्धा त्यांना घ्यावं लागेल आणि याचा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.
नागपूर पोलीसांनी केलेल्या तक्रारीनंतरच वकिल सतीश उकेंवर कारवाई
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक समजले जाणारे अॅड. सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर आज त्यांना विशेष ईडी कोर्टात हजर करणार आहेत. दरम्यान यावर फडणवीस म्हणाले, सतीश उकेंवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, नागपूर पोलीसांनी गुन्हा दखल केला होता. ज्या गुन्ह्यामध्ये ईडीला तक्रार करण्यात झाली, त्यावरून ईडीने कारवाई केलीय. मुळ कारवाई नागपूर पोलीसांची तसचे महाराष्ट्र पोलीसांची आहे. ज्याच्या आधारावरच ईडीने ही कारवाई केलीय. उकें विरुद्ध 2005 पासून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत,एवढंच नाही तर वेगवेगळ्या न्यायाधीशांची खोटी तक्रार केल्याबद्दल न्यायालयाचा अवमान प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झाला,त्यांनी त्याना शिक्षा दिली, सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तिथेही ही शिक्षा का वाढविण्यात येऊ नये? अशा प्रकारचा निर्णय दिला,आणि आता सर्वोच्च न्यायालयात ते प्रलंबित आहे, त्यामुळं त्यांना जजेस ची खोटी तक्रार करण्याची सुद्धा शिक्षा झाली आहे, मला असे वाटते जे कायदेशीर आहे ते कायद्याने होईल आणि तेच ईडी करेल. असे फडणवीस म्हणाले. जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर छापा मारला होता. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता अटक करण्यात आली. ईडीने अॅड. सतीश उके यांच्या भावालाही ताब्यात घेतले असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
विमानाने मुंबईत आणण्यात आले असल्याचा आरोप
नागपूरमध्ये ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन अॅड. सतीश उके यांना मुंबई आणण्यात आले आहे. ईडीकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांचे वकील अॅड. रवी जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी सांगितले की, नागपूरमधील उके यांच्या घरी ईडीने छापा मारला. त्यानंतर काल सतीश उकेंना अटक करण्यात आली. नागपूरमध्ये त्यांना कोणत्याही कोर्टात हजर करण्यात आले नाही. याउलट त्यांना घेऊन सकाळच्या विमानाने मुंबईत आणण्यात आले असल्याचा आरोप अॅड. जाधव यांनी केला.
नवीन वर्षाच्या निमित्ताने मुंबईकरांना मोठी भेट
मराठी नवीन वर्षाच्यानिमित्ताने मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार
'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.
'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके
मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
- Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
- Mns Melava: मनसेकडून गुढीपाडव्याला भव्य मेळाव्याचे आयोजन, तिथीनुसार शिवजयंती करणार साजरी