![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mns Melava: मनसेकडून गुढीपाडव्याला भव्य मेळाव्याचे आयोजन, तिथीनुसार शिवजयंती करणार साजरी
Mns Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे भव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे.
![Mns Melava: मनसेकडून गुढीपाडव्याला भव्य मेळाव्याचे आयोजन, तिथीनुसार शिवजयंती करणार साजरी MNS organizes grand Gudipadva Melava Shiva Jayanti will be celebrated according to the date Mns Melava: मनसेकडून गुढीपाडव्याला भव्य मेळाव्याचे आयोजन, तिथीनुसार शिवजयंती करणार साजरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/15213807/raj-thackeray-101.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mns Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे भव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या मेळाव्याला राज्यातून दरवर्षी हजारो मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे दाखल होतात. त्यामुळे या सभेच्या तयारीसाठी मनसेतर्फे आज वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई, राजू पाटीलसह इतर मनसे नेतेही या उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पाडव्यासोबत मनसे 21 मार्चला तिथीनुसार शिवजयंतीही साजरी करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 21 मार्चला तिथीनुसार शिवजयंती शिवतीर्थावर साजरी करून मनसे मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं समजलं आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवजयंतीला शिवाजी पार्कवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक शिवाजी पार्कवर जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत, ''आज मनसेच्या प्रमुख नेते मंडळींसोबत राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत दोन-तीन विषयावर चर्चा झाली. मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी केली जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच महिलांनी त्यामध्ये उत्साहात सहभागी व्हायचे आहे, अशा सूचना करण्यात आल्या असल्याचं ते म्हणाले आहेत. यासोबतच शिवाजी पार्कवर शिवजयंतीला स्वतः राज ठाकरे जातील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ''निवडणुका कधी होतील? माहीत नाही. पण निवडणुका होऊ शकतात, हे गृहीत धरून निवडणुकांची तयारी पूर्णपणे ताकदीने करायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.''
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत
HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)