एक्स्प्लोर

फडणवीसजी, लोडशेडिंगबाबतचा ‘हा’ व्हिडीओ आठवतोय का?

आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात भाजप सरकारने लोडशेडिंग लागू केलं आहे. त्यानंतर फडणवीसांचा हा जुन्हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : राजकीय नेते विरोधात असताना दिलेली आश्वासनं सत्तेत आल्यानंतर विसरतात, हे काही नवीन नाही. हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडलंय. फडणवीस विरोधात असताना अत्यंत आक्रमकपणे आघाडी सरकारने केलेल्या लोडशेडिंगविरोधात बोलत होते आणि लोडशेडिंगमुक्तीसाठी भाजपकडे सत्ता देण्याचं आवाहन करत होते. फडणवीसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधात असताना फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
"महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अजूनही लोडशेडिंग आहे. शेतकऱ्याला वीज मिळत नाही. त्याच्या शेतामध्ये पाणी आहे, पण वीज नाही. त्यामुळे तो सिंचन करु शकत नाही. आज मुलं शिकू शकत नाहीत. महाराष्ट्राची स्थापित क्षमतेच्या केवळ 50 टक्के आम्ही जनरेशन करतो. कारण आम्हाला महागडी वीज विकत घ्यायचीय. खासगी लोकांची. आणि मग महागड्या दराने वीज द्यायची. लोडशेडिंग करायचं. आणि हजारो कोटी कमवायचे. कोळशाचा घोटाळा करायचा. खरेदीचा घोटाळा करायचा. या सगळ्या घोटाळ्यातना महागडी वीज महाराष्ट्राला घ्यावी लागतेय. आणि त्याचसोबत महाराष्ट्राला लोडशेडिंग सहन करावं लागत आहे. आता कुठेतरी महाराष्टाला अंधकार देणाऱ्यांना दूर करु आणि महाराष्ट्रात प्रकाश आणू शकतील, अशांना महाराष्ट्राची सूत्र देऊ, हेच आपल्याला ठरवायचंय." - देवेंद्र फडणवीस 
हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस विरोधात होते, त्यावेळीचा आहे. फडणवीस त्यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात भाजप सरकारने लोडशेडिंग लागू केलं आहे. त्यानंतर फडणवीसांचा हा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून फडणवीसांची आश्वासनं किती फोल ठरली आहेत, हे दिसून येते. व्हिडीओ : महाराष्ट्रात सध्या विजेची काय स्थिती? वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचे लोडशेडिंग सुरु झालं आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर हीटमध्ये लोकांचा चांगलाच फटका बसला आहे. शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज लोडशेडिंग लागू करण्यात आलंय. कालपासून हे लोडशेडिंग लागू झालंय. राज्यात २२०० ते २३०० मेगावॉटचे लोडशेडिंग होत असल्यानं कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आलीय.  लोडशेडिंगचं संकट वाढत आहे. आणि दिवाळीवरही लोडशेडिंगचे सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरचण कंपनीची धावपळ सुरु आहे. संबंधित बातम्या : ठाणे, नवी मुंबईसह महानगरांत भारनियमन सुरु कोळशाचा तुटवडा, राज्यात तब्बल 14 तासांपर्यंत भारनियमन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
Bopdev Ghat Incident: तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
Embed widget