एक्स्प्लोर

Dengue : साथरोगांनी डोकेवर काढले, औरंगाबादकरांची चिंता वाढली; 18 दिवसांत डेंग्यूचे 27 रुग्ण आढळले

Aurangabad : जुलै महिन्याच्या 18 दिवसांत डेंग्यूचे तब्बल 27 रुग्ण आढळून आल्याने, आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

Dengue Patient in Aurangabad : मागील काही दिवसांत सुरु असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे जिल्ह्यात डेंग्यूसह (Dengue) साथरोगांनी डोकेवर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारीपासून ते आजपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल 84 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या 18 दिवसांत डेंग्यूचे तब्बल 27 रुग्ण आढळून आल्याने, आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करत आरोग्य विभागाने काही सूचना देखील केल्या आहेत. 

पावसाळा सुरु होऊन महिना उलटला असताना जिल्ह्यात अजूनही सर्वदूर सलग मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, नुसतीच पावसाची रिपरिप सुरु असल्याने जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण देखील वाढायला सुरुवात झाली आहे. 18 दिवसांत 27 रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. तर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहेत. सोबतच गॅस्ट्रोची रुग्ण देखील वाढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील परिस्थिती...

  • जून महिन्यामध्ये जिल्ह्यातील 50 संशयितांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 17 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. तर या महिन्यांमध्ये आतापर्यंत डेंग्यूचे 27 रुग्ण आढळून आले आहेत.
  • जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण 84 रुग्ण आढळले असून, यात 31 रुग्ण हे शहरातील आहेत.
  • पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटदुखी, उलटीसह गॅस्ट्रोचा त्रास देखील वाढला आहे.
  • शहरात जानेवारीपासून ते आजपर्यंत गॅस्ट्रोचे तब्बल 57 रुग्ण आढळले आहेत. यात जुलै महिन्यांच्या 17 दिवसांत 7 गॅस्ट्रो रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाचे आवाहन...

साथरोगांनी डोकेवर काढले असल्याने या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून साथरोग निर्मूलनासाठी घरोघरी सर्वेक्षण, डास उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, नागरिकांना घर व परिसरात स्वच्छता ठेवणे, कोरडा दिवस पाळणे यासाठी जनजागृती केली जात आहे. तर डास अळी सर्वेक्षण, अॅबेटिंग, औषधी फवारणीसह आवश्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत. घरात, परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नये, स्वच्छता ठेवावी. लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

डेंग्यू, चिकनगुनिया यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवसा पाळावा. हौद, टाक्यांना नेहमी झाकण लावावे. घरातील कुलर्समध्ये पाणी, फुलदाण्यातील, मनीप्लॅटमधील पाणी आठवड्यातून कमीत कमी एकदा बदलावे.
  • घरातील सांडपाण्यात अबेट (टेमीफॉस) हे डास अळी प्रतिबंधात्मक औषध टाकून घ्यावे. घरात/परिसरात पाणी साचू देऊ नये, वाहते करावे.
  • डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वडया यांचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे आणि मच्छरदाणीचा वापर करावा.
  • महानगरपालिकेतर्फे धूर फवारणी, औषध फवारणी, अॅबेट टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
  • डेंग्यू, चिकनगुनिया हा आजार नोटीफायबल आजार असल्यामुळे रुग्ण आढळल्यास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी 24 तासाच्या आत मनपा आरोग्य विभागास कळवणे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 1949 नुसार बंधनकारक आहे. डेंग्यू, चिकनगुनिया या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत महानगरपालिकेच्या नजिकच्या आरोग्य केंद्रावर, रुग्णालयात संपर्क साधावा.

जलजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • नेहमी शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. (उकळलेले किंवा क्लोरिनयुक्त)
  • अन्नपदार्थ नेहमी शिजवून आणि ताजे खावे, शिळे अन्न खाण्याचे टाळावे, अन्नपदार्थ नेहमी झाकलेले असावे. उघड्यावरील कापून ठेवलेली फळे, अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, जास्त पिकलेली, कुजलेली, सडलेली फळे खाण्याचे टाळावे.
  • अन्न शिजवण्यापूर्वी, जेवणापूर्वी तसेच शौचास जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावर शौचास बसू नये. सर्वांनी वैयक्तिक स्वच्छता तसेच घर व परिसर स्वच्छता ठेवावी.
  • सर्व रुग्णांनी जवळच्या मनपाच्या आरोग्य केंद्र,रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Dengue in Children : पावसाळ्यात लहान मुलांचा डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget