एक्स्प्लोर
Advertisement
बँकांबाहेरील रांगांचं नेमकं कारण काय?
मुंबई: मोठमोठ्या रांगा आणि अमर्याद प्रतीक्षा, गेल्या 10 दिवसांपासून देशभरातल्या बँकांबाहेरचं हे चित्र आजही कायम आहे. पण प्रश्न असा आहे... की जर या देशातल्या गरिबांकडे पैसा नाही, तर मग रांगेत कोण उभंय?.
ही रांग नक्की कुणाची आहे...? पैसे भरणाऱ्यांची? काढणाऱ्यांची? की नोटा बदलून घेणाऱ्यांची...? आणि जे लोक नोटा बदलून घेतायत? ते खरेच त्या नोटांचे धनी आहेत का? हेच शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.. आणि समोर आलं... धक्कादायक वास्तव.
लायनीत उभे राहण्यासाठी... आणि काळा पैसा जिरवण्यासाठी चक्क भाडेकरु मिळतायत... आम्ही राजधानीत दिल्लीत याप्रकरणी स्टिंग केलं. यामध्ये पैसे बदलण्यासाठी भाड्याने माणसं उभी असल्याचं दिसून आलं.
पेट्रोल पंपावरही पैसे काढता येणार, रांगा कमी करण्यासाठी नवा उपाय!
हा प्रकार काल परवा सुरु झालेला नाही, तर 8 नोव्हेंबरला मोदींनी घोषणा करताच दुसऱ्या दिवसापासून बँकांबाहेरच्या रांगेत 50 टक्के भाडोत्रीच माणसे होती.
इतकंच नाही... तर आता हे भाडोत्री रांगधारी थेट मांडवलीही करु लागले आहेत.
खरं तर रोज नव्या भाडोत्री माणसाला हाताशी धरून धनदांडगे आपले काळे पैसे पांढरे करुन घेत आहेत. प्रत्येकी 4 हजार नोटा एकावेळी जर पांढऱ्या होत आहेत.. त्यामुळे काळ्यापैसेवाल्यांनी अशा टोळ्याच थाटल्या आहेत.
पण या अशा भाडोत्री रांगधारींमुळे फरफट होते ती सामान्य ग्राहकाची. ज्याला आपल्या कष्टाच्या पैशांचा परतावा याच रांगेत तिष्ठत घ्यावा लागतोय. त्यामुळे या रांगेतून भाडोत्री वजा केले, तर लाईन किमान निम्म्यावर येईल यात शंका नाही.
संबंधित बातम्या
पेट्रोल पंपावरही पैसे काढता येणार, रांगा कमी करण्यासाठी नवा उपाय!
'सर्जिकल स्ट्राईक 2' ची तयारी, स्थावर मालमत्ता रडारवर
नोटबंदीचा दहावा दिवस, मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील महापालिका मालामाल, 6 दिवसात 766 कोटी रुपये जमा
सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी नाहीच : जेटली
आता लग्नासाठी बँकेमधून अडीच लाख काढता येणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
Advertisement