कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना 'कोरोना योद्धा' जाहीर करा, इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी
खासगी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांसाठीसुद्धा विमा कवच जाहीर करावं तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करावं अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.
मुंबई : गेले अनेक दिवस राज्यातील डॉक्टर जीवाची बाजी लावून कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेत आहे. त्याच्यावर उपचार करता करता काही डॉक्टरांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा डॉक्टरांना राज्य शासनाने कोरोना योद्धा जाहीर करून त्याचं कोरोना वीरचक्र देऊन गौरव केला पाहिजे अशी मागणी इंडियन मेडिकल अससोसिएशनने (आयएमए ) केली आहे.
यापूर्वीच मानसिक आणि शारीरिक दुःखातून बाहेर काढणाऱ्या या डॉक्टरांना कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. अशा कठीण प्रसंगात अनेक डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करून बरे करत आहेत. या लढाईत मात्र काही योद्धे कोरोनाची लागण होऊन घायाळ झाले आहेत.
सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ चित्तरंजन भावे 61, यांचे निधन झाले. त्यांची अॅन्जोप्लास्टी झाली असून त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तरीही केवळ रुग्णसेवेपोटी ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांना रुग्णांवर उपचार देताना कोरोनाची बाधा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत आयएममएचे 500 डॉक्टर अलगीकरण कक्षात असून काही यापैकी जणांवर उपचार सुरु आहे. विशेष शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या रेसिडेंट डॉक्टरांना या संसर्गाची बाधा झाली आहे.
कोरोना योद्धा जाही करण्याच्या मागणीबरोबरच आयएमए आणखी काही मागण्या केल्या आहेत. त्यात, शासकीय आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर याना ज्या पद्धतीने 50 लाखाचे विमा कवच जाहीर केले आहे, त्याप्रमाणे ते खासगी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना जाहीर करावे. तसेच गुणवत्तापूर्ण पीपीई किट रास्त भावात बाजारात उपलब्ध करून दयावे जेणे करून खासगी व्यवस्तीत डॉक्टर याचा वापर करू शकतात. त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनी खासगी सेवेतील डॉक्टर आणि परिचारिकांना अपराधीपणाची वागणूक देऊ नये.
याप्रकरणी महाराष्ट्र आयएमए, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात कीय, " डॉ. भावे यांचा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, ते अगदी शेवटपर्यंत कार्यरत होते. आमचे डॉक्टर कोरोना सारख्या महाभयंकर संकटात स्वतःचा प्राण धोक्यात घालून उपचार करीत आहे. त्यात त्यांना जर या आजाराचा प्रादुर्भाव झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याकरिता शासनाने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला पाहिजे आणि त्यांचा कोरोना वीरचक्रन सन्मानित केलं पाहिजे. आतापर्यंत सहा डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे शासकीय आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना ज्या पद्धतीने 50 लाखाचे विमा कवच जाहीर केले आहे त्याप्रमाणे ते खासगी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना जाहीर केले पाहिजे अशी आमची मागणी आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )