Salim Kutta: नितेश राणे वेडा आहे, तो सलीम कुत्ता कधीच मेलाय; आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्लाबोल
Salim Kutta : नितेश राणे हे वेडे झाले असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुट्टाचा मृत्यू झाल्याचे आमदार गोरंट्याल यांनी म्हटले आहे.
![Salim Kutta: नितेश राणे वेडा आहे, तो सलीम कुत्ता कधीच मेलाय; आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्लाबोल Dawood Ibrahim Close aid Salim Kutta with Politician Congress MLA Kailas Gorantyal criticized on BJP MLA Nitesh Rane Salim Kutta: नितेश राणे वेडा आहे, तो सलीम कुत्ता कधीच मेलाय; आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/18/062225b832aa662b05807e022299e3821702896961684290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Salim Kutta Case : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरून (Salim Kutta) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal) यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे हे वेडे झाले असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुट्टाचा मृत्यू झाल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले. या प्रकरणी माझी खुशाल चौकशी करा, मी 24 तास इथेच असल्याचे आव्हानही गोरंट्याल यांनी दिले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मागील आठवड्यात दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ता याच्याशी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस गु्न्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर आज 1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.
कैलास गोरंट्याल यांनी म्हटले की, मी जो सलीम कुत्ता सांगतोय त्याचा 1998 साली मृत्यू झाला आहे. आता नितेश राणे सांगत आहेत तो चुकीचा सलीम कुत्ता आहे. नितेश राणे वेडा आहे. माझी चौकशी करायची करा, मी 24 तास इकडे बसून असल्याचे आव्हान त्यांनी दिले. पण, माझी बदनामी करणार असेल तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
सलीम कुत्ताची 1998 मध्येच हत्या, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा
सलीम कुत्ता याची 1998 मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार 1998 साली 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याचा रुग्णालयात मर्डर झाला आहे. रोहित वर्मा भानू ढाकरे आणि संतोष शेट्टी हे छोटा राजन चे हस्तक आहेत. त्यांनी त्याला मारला आहे. आता यामध्ये नवीन सलीम कुत्ता यांनी कुठून आणला हे माहीत नाही. सलीम कुत्ता यांच्या तीन पत्नी आहेत त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितले की आमचा पती वारला. त्यांनी हे सुद्धा सांगितले की आमची जी प्रॉपर्टी सील केली आहे, ती रिलीज करा. टाडा कडून त्याची प्रॉपर्टी सुद्धा रिलीज करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना या सगळ्या बाबत माहिती असतात त्यामुळे सभागृहात त्यांनी निवेदन केलं पाहिजे, असे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)