सलीम कुत्ता जिवंत की मृत, गोरंट्याल यांच्या दाव्याने खळबळ, नेमकं सत्य काय?
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता (Salim Kutta) याची सध्या जोरदार चर्चा आहे. सलीम कुत्ताच्या (Salim Kutta) पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) सहभागी असल्याचा आरोप झालाय.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता (Salim Kutta) याची सध्या जोरदार चर्चा आहे. सलीम कुत्ताच्या (Salim Kutta) पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) सहभागी असल्याचा आरोप झालाय. त्यावरुन आता मोठा वाद सुरु असतानाच, आता तो जिवंत आहे की मृत याची चर्चा रंगली आहे. 1998 मध्ये सलीम कुत्ताची (Salim Kutta death News) रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal) यांनी केलाय. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय.
सलीम कुत्ताची 1998 मध्येच हत्या, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा
सलीम कुत्ता याची 1998 मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार 1998 साली 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याचा रुग्णालयात मर्डर झाला आहे. रोहित वर्मा भानू ढाकरे आणि संतोष शेट्टी हे छोटा राजन चे हस्तक आहेत. त्यांनी त्याला मारला आहे. आता यामध्ये नवीन सलीम कुत्ता यांनी कुठून आणला हे माहीत नाही. सलीम कुत्ता यांच्या तीन पत्नी आहेत त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितले की आमचा पती वारला. त्यांनी हे सुद्धा सांगितले की आमची जी प्रॉपर्टी सील केली आहे, ती रिलीज करा. टाडा कडून त्याची प्रॉपर्टी सुद्धा रिलीज करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना या सगळ्या बाबत माहिती असतात त्यामुळे सभागृहात त्यांनी निवेदन केलं पाहिजे, असे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
कैलास गोरंट्याल यांच्या दाव्यात तथ्य वाटत नाही -
सलीम कुत्ता डी कंपनीचा मोठा हस्तक होता. त्याने अनेक खून केलेत. त्याने ड्रग्जचेही काम केलेय. आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या दाव्यात मला तथ्य वाटत नाही. सलीम कुत्ता याचा मृत्यू झालाय? याबाबत अद्याप अधिकृत माहिती कुणीही दिली नाही, असे सिनियर पत्रकार एस बाळकृष्णन यांनी सांगितलं. सलीम कुत्ता याच्याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही, पण आमदार कैलास गोरंट्याल कशाच्या आधारावर समील कुत्ताचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. त्यांची चौकशी करायला हवी, असेही बाळकृष्णन म्हणाले.
सलीम कुत्ता जिवंत, सलीम कुर्ला 1998 मध्ये मारला गेला -
आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी सलीम कुत्ता यांच्यासंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी चर्चा केली. पोलिसांच्या मते आमदार कैलाश गोरंट्याल यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. 1998 मध्ये जो व्यक्ती मारला गेला, त्याचं नाव सलीम कुर्ला असं नाव होतं. सलीम कुर्ला हा मुंबई बॉम्बब्लॉस्टचा आरोपी होता. सलीम कुर्ला हा एजंटचं काम करायचा. तो खोटे पासपोर्ट तयार करायचा. त्यानेच बॉम्बस्फोटातील आरोपीचे पासपोर्ट तयार केले होते. 1998 मध्ये त्याला छोटा राजनच्या गँगने मारले होते. सलीम कुत्ता हा अद्याप येरवाडा जेलमध्ये जिवंत आहे. 1998 मध्ये सलीम कुर्ला याला मारला होता.
सलीम कुत्ता सध्या कुठे?
सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. त्याआधी तो नाशिक येथील कारागृहात होता. तिथून तो पॅरोलवर सुटला होता. तो डान्स करत असतानाचा व्हिडीओ तो नाशिक कारागृहातून पॅरोलवर सुटला असतानाचा आहे. येरवडा कारागृहातून तो पॅरोलवर सुटलेला नाही.