एक्स्प्लोर

Sugarcane Kulfi : दौंडमधील शेतकऱ्यांनी बनवली ऊसापासून कुल्फी; कुल्फीवर सगळेच फिदा...

आजपर्यंत आपण ऊसापासून साखर, गूळ आणि काकवी तयार झालेली बघितली असेल परंतु ऊसापासून कुल्फी बनवलेली पाहिली आहे का? होय फक्त कुल्फीच नाही तर ऊसापासून कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे.

Sugarcane Kulfi : आजपर्यंत आपण (Sugarcane) ऊसापासून साखर, गूळ आणि काकवी तयार झालेली बघितली असेल परंतु ऊसापासून कुल्फी (Kulfi) बनवलेली पाहिली आहे का? होय फक्त कुल्फीच नाही तर ऊसापासून कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे. दौंड (Daund) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ग्रुपने ऊसापासून हे सगळे पदार्थ बनवले आहेत. ऊसापासून तयार केलेल्या या सगळ्या उपपदार्थांवर नागरिक चांगलेच फिदा झाले आहेत. 

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आईस्क्रीम आणि कुल्फीवर हमखास ताव मारताना दिसतात. हेच ओळखून ऊसाच्या कुल्फीची कल्पना सुचली. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मॅजिक केन सेलिब्रिटिंग फार्मर्स ग्रुप बनवला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी ऊसापासून कुल्फी, चटणी, बर्फ गोळा, जाम बनवत आहेत. त्याला चांगली मागणी आहे.

कोरोना काळात अनेकांनी आपले नवीन व्यवसाय सुरु केले. त्याचप्रमाणे कोरोनानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ऊसाच्या कुल्फीचा व्यवसाय सुरु केला. कुल्फीला सध्या चांगली मागणी आहे. दहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी अर्धा एकर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून ते ऊसापासूनचे उपपदार्थ बनवत आहेत. ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. जर ऊस कारखान्याला दिला असता तर टनाला 2 ते 3 हजार रुपये मिळाले असते परंतु त्यांना कुल्फी बनवल्या नंतर त्यांना 15 हजार रुपये प्रति टन दर मिळतो आहे. 

ऊसाच्या कुल्फीवर नागरिक फिदा...

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ऊसापासून बनवलेली कुल्फी ही ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे. दररोज 1000 ते 1200 कुल्फी विकल्या जातात. अष्टविनायक रस्त्यालगत आऊटलेट असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आहे. ऊसाची कुल्फी पहिल्यांदा पाहिल्याने लोक इथे थांबत आहेत. ऊसापासूनची कुल्फी ही आरोग्यदायी असल्याचे सांगत आहेत. थंड कुल्फी खाल्ल्याने आरोग्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच कुल्फीची किंमत देखील फक्त 10 रुपये आहे. यासाठी लागणारी मशनिरी ही मुंबई आयआयटीमधून आणण्यात आली आहे. ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी 6 महिने टिकते. ग्रुपमधील शेतकऱ्यांना रोजचे हजार रुपये मिळत आहेत. अनेकदा ऊस कारखान्याला जात नाही म्हणून शेतकरी ऊस पेटवून कारखान्याला घालवतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल यात शंका नाही.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget