एक्स्प्लोर

LIVE UPDATES | पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 506 फेऱ्यांऐवजी आता 700 लोकलच्या फेऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन Mumbai Power Cut | केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार, आपत्तींवरच्या उपायांबाबत महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करणार सलमान, शाहरुख, अजय देवगनसह बॉलिवूडमधील बडे निर्माते रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात दिल्ली हायकोर्टात IPL2020, RCBvsKKR | रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES | पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 506 फेऱ्यांऐवजी आता 700 लोकलच्या फेऱ्या

Background

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

 

कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची 'उखाड दिया' मुलाखत

 

शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची लवकरच 'शट अप यार कुणाल' या पॉडकास्ट मध्ये मुलाखत होणार असल्याचं दोघांनीही ट्विटरवरून जाहीर केलं होतं. या पोस्टचं अनेकांनी स्वागत केलं तर काहींनी ट्रोलही केलं.

 

आज मुंबईत खारमधल्या एका खासगी स्टुडियोत या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आलं. थोड्याच दिवसात याचं समाज माध्यमांवर प्रक्षेपण होणार आहे. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.

 

आजच्या या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते आणि या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

 

सांगली - खानापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस,अग्रणी नदीला पूर

 

सांगली जिल्ह्यामध्ये रविवारी पाऊसाचा कहर झाला आहे. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर,तासगाव आणि कडेगाव या तालुक्‍यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.तर खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. अग्रणी नदीवरील करंजे आणि बलवडी मधील पुलावरून दोघेजण वाहून गेले आहेत.

 

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवादार असा पाऊस पडला आहे. दुपारपासून सांगली शहरासह जिल्ह्यातल्या तासगाव, कडेगाव आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तर इतर तालुक्यातील जोरदार पाऊस पडला आहे. विशेष खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी असणार्‍या नदी-नाले आणि अग्रणी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर या झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले. तर खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आला असून झरे, बलवडी, बेनापूर पुलावर पाणी आले आहे तर अन्य ओढ्यांनासुद्धा पूर आला आहे. तसेच विटा - कराड रोड वरील नांदणी व येरळा नदीवरील डायव्हर्शन केलेला कचे पूल नदीला आलेल्या पुराने वाहून गेले आहे. त्यामुळे विटा कराड रस्त्याची वाहतूक शिवणी मार्गे चालू आहे. याशिवाय जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील नदी, नाले आणि ओढ्यांना सुध्दा पूर आला आहे,त्यामुळे या ठिकाणी असणारे छोटे बंधारे आणि छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.

 

टीआरपी घोटाळा प्रकरण, मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी

 

टीआरपी घोटाळा प्रकरणी आज दिवसभर मुंबई क्राईम ब्रान्चने रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी, हर्ष भंडारी यांची मुंबईत तर दमणमध्ये डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग यांची पोलिसांनी चौकशी केली. या तिघांनाही उद्या चौकशीसाठी कागदपत्रांसह पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. CRPC 91 अंतर्गत नोटीस बजावली असून चॅनलला मिळालेल्या जाहिराती, त्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर महत्त्वाची कागदपत्र घेऊन चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

 

टीआरपी घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची 9 तास, COO हर्ष भंडारी यांची 6 तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची 6 तास कसून चौकशी केली आहे. या तिघांनाही टीव्ही जाहिराती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोलिसांकडे जमा करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, नफा, तोटा यांसंदर्भातला सगळा डाटा रिपब्लिकला पोलिसकडे द्यावा लागणार आहे.

 

कालच्या चौकशीत टीव्हीवर दिसणाऱ्या कंटेंटशी आमचे देणंघेणं नसून त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, अशी माहिती विकास खानचंदानी यांनी दिली आहे. काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यामध्ये हंसा नावाच्या कंपनीचा अहवाल आहे. असं सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडेवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र हंसा कंपनीने तो अहवाल स्वतःचा नसल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. या संदर्भात वेगळी चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. आज या शो संदर्भात उत्तर देण्यास विकास खानचंदानी यांनी असमर्थता दर्शवली आहे.

 

IPL 2020, MIvsDC : मुंबईकडून दिल्लीचा 5 विकेटने पराभव; डिकॉक-सूर्यकुमार यादव विजयाचे हिरो

 

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेटने पराभव करत पॉईंट टेबलमध्ये नंबर वनवर पोहोचली आहे. दिल्लीने मुंबईला 163 धावाचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 19.4 षटकात पूर्ण केलं. क्विंटन डिकॉक आणि सू्र्यकुमार यादवची खेळी निर्णायक ठरली. मात्र दिल्लीकडून शिखर धवनची नाबाद अर्थशतकी खेळी व्यर्थ गेली. पॉईंट टेबलमध्ये मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघांचे 10-10 गुण आहेत. दोन्ही संघांनी 7 सामन्यांपैकी 5-5 सामने जिंकले आहेत. मात्र नेट रनरेट जास्त मुंबई नंबर वनवर पोहोचली आहे.

 

दिल्लीने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 5 धावा करत तंबूत परतला. त्यावेळी क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमारने डाव सावरला. डिकॉकने 36 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने 4 चौकर आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार यादवने 32 धावात 53 धावांची खेळी केली. त्याने 6 चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर ईशान किशनने 28 धावा, कायरन पोलार्ड 11 धावा, कृणाल पांड्याने 12 धावांची खेळी केली. बर्थडे बॉय हार्दिक पांड्या मात्र आज शुन्यावर बाद झाला. दिल्लीकडून कागिसो रबाडाने 2, अक्षर पटेल, आर अश्विन, मार्क्स स्टॉयनिसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

21:09 PM (IST)  •  13 Oct 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे किंवा इतर अन्य कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून सुद्धा JEE Advanced 2020 परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना 2021 मध्ये परीक्षा देता येणार. असे विद्यार्थी JEE Main 2021 परीक्षा न देता सरळ JEE Advanced 2021 परीक्षेस पात्र असणार, जॉईंट अॅडमिशन बोर्डकडून निर्णय घेण्यात आला आहे.
21:57 PM (IST)  •  13 Oct 2020

आरटीपीसीआर किट या बाबीसाठी हाफकिन खरेदी कक्षामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेमध्ये मे.जीसीसी बायोटेक इंडिया प्रा.ली यांना आयसीएमआर यांनी प्रमाणित केले.या कंपनीचा उत्पादन दर सर्वात कमी म्हणजे रुपये ५५ प्रति चाचणी असल्यामुळे यांना १२ लाख ६० हजार आरटीपीसीआर किट्स पुरवठा करणेबाबतचे आदेश देण्यात आले.एकूण संख्या पैकी ६ लाख २९ हजार चाचण्यांचा पुरवठा केल्यानंतर एनआयव्ही पुणे यांचेमार्फत या आरटीपीसीआर चाचण्यांची तपासणी करून घेण्यात आली.या तपासणीअंती राष्ट्रीय विषाणू संस्था (एन.आय.व्ही) पुणे यांनी चाचण्या योग्य असल्याबाबतचा अहवाल दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी दिल्यानंतरच सर्व प्रयोगशाळांना वरील किटच्या चाचण्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यानच्या काळात या चाचण्या योग्य नसल्याबाबत काही तक्रारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पाच सदस्यांमार्फत या चाचण्यांची तपासणी केली. आरटीपीसीआर बॅच नं.२०११५के१३१२ योग्य नसल्याचे मत समितीने ९ ऑक्टोबर २०२० रोजी दिल्यामुळे या किटच्या असमाधानकारक परिणामांमुळे एकूण ६ लाख ५० हजार चाचण्यांचा पुरवठा तात्काळ थांबविण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे एकूण ६ लाख २९ हजार चाचण्या बदलून देण्याबाबत या कार्यालयाने ९ ऑक्टोबर २०२० रोजी मे.जीसीसी बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना कळविले असल्याचे हाफकीनचे जीव-औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले.तरी,हाफकिन खरेदी कक्षामार्फत आरटीपीसीआर किट्सचा सुरळीत पुरवठा होईपर्यंत दैनंदिन चाचण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था (एन.आय.व्ही) यांच्यामार्फत आरटीपीसीआर पुरवठा चालू ठेवण्याकरिता विनंती करण्यात आली असून या विनंतीला एन.आय.व्ही यांच्यामार्फत मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे या कालावधीत रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नसून पूर्वीप्रमाणे चाचण्या सुरू राहतील असे मत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.टी.पी. लहाने यांनी व्यक्त केले आहे.
20:26 PM (IST)  •  13 Oct 2020

औरंगाबाद सार्वजनिक वाहन चालवताना वाहन चालकाने मास्क वापरणे बंधनकारक, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय, नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्याचा पहिल्यांदा 30 दिवस तर दुसऱ्या वेळी मास्क घातला नाही तर 90 दिवसांकरीत वाहन परवाना रद्द करणार, .तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय
20:58 PM (IST)  •  13 Oct 2020

पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 506 फेऱ्यांऐवजी आता धावणार 700 लोकलच्या फेऱ्या, तसेच लॉकडाऊनपासून बंद असलेली एसी लोकल देखील आता धावणार, एसी लोकलच्या 10 फेऱ्या पश्चिम रेल्वे चालवणार , हे बदल 15 ऑक्टोबरपासून लागू होणार
20:25 PM (IST)  •  13 Oct 2020

गडचिरोली राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, चंद्रपूरहून गडचिरोलीत दाखल होणारा अवैध दारूसाठा केला जप्‍त, सुमारे 15 लाख रुपयांचा देशीदारू मुद्देमाल केला जप्त, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील तीन आरोपी अटकेत, रिकाम्या ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करून गडचिरोलीत आणला जात होता अवैध दारूसाठा, गडचिरोलीत दारूबंदी अपयशी होत असल्याची चर्चा होत असताना उत्पादन शुल्क विभाग झाला सक्रिय
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidya Lolge:Sambhaji Bhide गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये,अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापूAmbadas Danve On Prasad Lad : राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन वाद; प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडलेAmbadas Danve Angry On Prasad Lad : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने विधानपरिषदेच खडाजंगीNagpur : दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, फडणवीसांची विधिमंडळात घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
Embed widget