एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना व्हायरसची साथ जगभर वेगाने पसरतेय : WHO डायरेक्टर जनरल

कोरोना बाधित रुग्णांचा एक लाखाचा टप्पा 67 दिवसांमध्ये पार झाला होता. त्यानंतर पुढील 11 दिवसात आणखी एक लाख लोकांना या रोगाची लागण झाली आणि त्यानंतर अवघ्या चार दिवसात आणखी एक लाख लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाली.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देश या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा हा उद्रेक रोखण्यासाठी सर्वच देशांना एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल तेड्रोस अढॅनोम घेब्रेयेसस यांनी सांगितलं. सोमवारी जिनिव्हा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोना व्हायरसची साथ अतिशय वेगाने पसरत आहे. आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लोक या साथीच्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहेत. जगभरात जवळपास 15 हजारांहून जास्त लोक यामध्ये मरण पावले आहेत. आता या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आक्रमक आणि योजनाबद्धपणे काम करण्याची गरज आहे, असं तेड्रोस अढॅनोम घेब्रेयेसस यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरस किती झपाट्याने पसरत आहे सांगताना त्यांनी माहिती दिली की, कोरोना बाधित रुग्णांचा एक लाखाचा टप्पा 67 दिवसांमध्ये पार झाला होता. त्यानंतर पुढील 11 दिवसात आणखी एक लाख लोकांना या रोगाची लागण झाली आणि त्यानंतर अवघ्या चार दिवसात आणखी एक लाख लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाली. म्हणजे हा वेग असाच कायम राहिल्यास किती मोठ्या प्रमाण लोकांना या रोगाची लागण होईल हे त्यांना सांगायचं होतं.

जगातील सर्व विकसित आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ देशांना एकत्र येऊन या कठीण परिस्थितीत काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच जी-20 देशांनी एकीने या संकटाचा सामना करायला हवा. जी- 20 देशांची दृढ एकता आपल्याला पुढे जाण्यास आणि या महामारीच्या विरोधात लढायला मदत करू शकते, असं यांनी म्हटलं.

गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण

जगभराताल आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास साधारण 3 लाख 78 हजार लोकांना कोरोना लागण झाली आहे. तर 16 हजर 502 जणांना या जीवघेण्या व्हायरसने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण आढळले आहेत, तर 1861 जणांचा मृत्यू झाला आहे. इटली कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये सर्वाधिक 6,077 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात इटलीत 601 जणांना आपला जीव गमावला आहे.

संबंधित बातम्या : coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय? Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य? Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget