मरकजसाठी आलेल्या 24 परदेशी आणि परराज्यातील 5 नागरिकांना अटक, अहमदनगर पोलिसांची कारवाई
अहमदनगरमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या 24 परदेशी आणि 5 परराज्यातील नागरिकांना अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व परदेशी नागरिक पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. मात्र पर्यटन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
अहमदनगर : तबलिकी जमातीच्या मरकजसाठी आलेल्या 24 परदेशी नागरिक आणि 5 परराज्यातील नागरिकांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या सर्व आरोपींना अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजार करण्यात आलं असून न्यायालयाने 24 विदेशी आणि 2 भारतीयांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, तर अन्य 3 भारतीयांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सर्व परदेशी नागरिक पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. हे नागरिक अहमदनगरमध्ये आल्यावर त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आलं होतं. क्वॉरंटाईनमधून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
परदेशातून आलेले 24 नागरिक हे पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. मात्र त्यांनी पर्यटन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून धार्मप्रचार करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे या 24 परदेशी नागरिक आणि 5 परराज्यातील नागरिकांवर अहमदनगरमधील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात, जामखेड आणि नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. काल रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
जीबुती, बेनिन, दिकोटा, इंडोनेशिया आणि आयव्हेरी कोस्ट या देशातील हे नागरिक आहेत. दिल्लीच्या मरकजवरून अहमदनगरमध्ये आल्यानंतर हे सर्व परदेशी नागरिक अहमदनगरमधील मुकुंदनगर, जामखेड आणि नेवासा येथील धार्मिक स्थळे राहिले होते. त्यामुळे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन, नेवासा पोलिस स्टेशन आणि जामखेड पोलिस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या- #Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?
- दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील
- Nizamuddin Markaz | 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल
- Nizamuddin Markaz | रत्नागिरीचं मरकज कनेक्शन उघड
Special Report | निजामुद्दीनमधून देशभरात कसा पसरला कोरोना? 24जण पॉझिटिव्ह, 334रुग्णालयात, 700क्वॉरंटाईन