LIVE UPDATES | तंत्रशिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्ट पासून
मुंबईत मुसळधार : अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह सातासमुद्रापार, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले भगवान राम आणि राममंदिराचे फोटो Maharashtra Rain | मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण Ram Mandir | श्री रामाचं मंदिर हे आधुनिक संस्कृतीचं प्रतीक बनेल : नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज
आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.
माझ्या हृदयाच्या जवळचं स्वप्न पूर्ण होतंय : लालकृष्ण अडवाणी
अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनाला काही तास उरलेले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया आली आहे. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न पूर्ण होत आहे, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. राममंदिर आंदोलनातील लालकृष्ण अडवाणी प्रमुख चेहरा होते. लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं की, जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होतं, ते पूर्ण होत आहे. अयोध्या येथे राम जन्मभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. निश्चित हे माझ्याच नाही देशातील करोडो लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.
शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्याआत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे, अशी प्रतिक्रिया युवासेना अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत दिली आहे. तसेच शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, असेही ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्या : नारायण राणे
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाली आहे, असा दावा राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. याप्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली. मात्र मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नाही. गेल्या 50 दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध का लावला नाही,’ असा सवाल देखील नारायण राणेंनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचीही टीका त्यांनी केली.