(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATES | राज्यात आज 7924 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8706 रुग्ण कोरोनामुक्त, आज 227 रुग्णांचा मृत्यू
सिनेमागृहं आणि जिम 1ऑगस्टपासून सुरु होण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रस्ताव राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, उद्धव ठाकरेंचा सल्ला ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
महत्वाच्या घडामोडी.....
सिनेमागृहं आणि जिम 1ऑगस्टपासून सुरु होण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रस्ताव
कोरोनामुळे देशांतील सर्व चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स बंद आहेत. बॉलिवूडचे सर्व मोठे चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, ज्यामुळे देशातील बड्या थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते कधी उघडणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनलॉक 3 च्या टप्प्यात अटी-शर्तींसह थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरु होण्याची शक्यता आहे. कारण माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तसा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे.
राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, उद्धव ठाकरेंचा सल्ला
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. मात्र कोरोनामुळं या भूमिपूजनाला विरोध करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला दिलाय. हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. उदगीरचे मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संजय बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. त्यानंतर त्यांची कोविड 19 टेस्ट करण्यात आली त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.