एक्स्प्लोर
Corona Update | राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू
आज राज्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. सध्या राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये 8 रुग्ण मुंबईचे असून 5 रुग्ण पुण्याचे, 2 नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 39 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे, तर आज 2 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे सध्या राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज राज्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका 78 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर कोरोना बाधित असलेल्या 52 वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती
- मुंबई - 92
- पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) - 43
- सांगली - 25
- मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा - 23
- नागपूर - 16
- यवतमाळ - 4
- अहमदनगर - 5
- सातारा, कोल्हापूर - 2
- औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक - प्रत्येकी 1
- इतर राज्य - गुजरात - 1
- Corona Update | राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू
- Corona | ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टी पाळा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!
- Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा
- India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड
आणखी वाचा























