Corona Update | लॉकडाऊनमध्ये दारुपार्टी करण्याची मस्ती, तिघांना पनवेलमध्ये अटक
कोरोनाच्या संकटानाला अनेकजण गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पनवेलमध्ये अशाचा तिघांना पोलिसांनी अटक केली. लॉकडाऊन असताना, घरात बसण्याच्या सूचना असताना हे तिघे जण चक्क दारुपार्टीसाठी गाडीतून निघाले होते.
मुंबई : देशभरात लॉकडाऊन केलेलं असतानाही अनेकजण ते गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पनवेलमध्ये पोलिसांनी अशाच तीन जणांना अटक केली आहे. संचारबंदी असताना हे तिघे दारु पार्टी करायला निघाले होते. कारमध्ये बियरच्या बाटल्या आणि इतर खाद्य पदार्थ घेऊन हे तिघे पार्टीच्या स्थळी निघाले होते. मात्र त्याआधीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले. शागिर छोटू खान, शिवा हनुमंता गुडपास, उबेद शकुर शेख अशी अटक केलेल्या तिघांची नावं आहे.
पोलीस अधिकारी अजय लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी नाकाबंदी सुरु असताना एका कारला पाहून तिथे असलेल्या पोलिसांना संशय आला. या कारमध्ये बसलेले तिघे जण अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडल्यासारखे वाटत नव्हते आणि शहर सोडून चालले असंही वाटत नव्हतं. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या तिघांचा चौकशी केली. त्यांच्या कारची तपासणी केली त्यावेळी गाडीत 35 बियरच्या बॉटल मिळाल्या. याशिवाय दारुसोबत खाण्यासाठी इतर सामानही त्यांनी सोबत घेतलं होतं.
पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे आणि कारही जप्त केली आहे. अटकेत असलेले शागिर छोटू खान, शिवा हनुमंता गुडपास, उबेद शकुर शेख हे तिघेही कुर्ला येथील रहिवाशी आहेत. तिघांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (अ) अंतर्गत आणि आयपीसी कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या बियरची किंमत जवळपास 5775 रुपये आहे. त्यानंतर तिन्ही आरोपींना CrPC 41(1)(अ) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी-अधिकारी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र काहींना अजूनही कोरोना व्हायरसरचं गांभीर्य कळालेलं नाही. सरकारकडून लोकांनी घराबाहेर पडू नये असं वारंवार आवाहन केलं जात आहे. मात्र अनेकजण सरकारच्या आवाहन न जुमानता बाहेर पडताना दिसत आहे. मात्र ही संचारबंदी नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहे, अजून काही जणांच्या डोक्यात शिरत नाही.
संबंधित बातम्या
- Corona Update | राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू
- Corona | ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टी पाळा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!
- Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा
- India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड