Corona Update | सलग चौथ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; वाढत्या रुग्ण संख्यने प्रशासनाची चिंता वाढली
राज्यात आज सलग चौथ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. आज 5 हजार 257 नवीन लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येमुळे 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई : राज्यात आज सलग चौथ्या दिवशी 5 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज राज्यात 5 हजार 257 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे. आज नवीन 2 हजार 385 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 88 हजार 960 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 73 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 181 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात आज सलग चौथ्या दिवशी पाच हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली. परिणामी आतापर्यंत 1 लाख 69 हजार 883 लोकांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. यापैकी 73 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 43 हजार 485 नमुन्यांपैकी 1 लाख 69 हजार 883 (18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 93 लोक होम क्लॉरंटाईनमध्ये आहेत तर 37 हजार 758 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 2 हजार 385 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.37 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 88 हजार 960 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
Mission Begin Again | राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम
राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनचराज्यात एक जुलैपासून "मिशन बिगीन अगेन"च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. यानुसार मागच्याच आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत ज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. एकप्रकारे राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवले असे म्हणायला हरकत नाही.
राज्यात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात
कोरोना व्हायरसवरील उपचार पद्धतीत महत्त्वाची समजली जाणारी आणि जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात सुरु झाली आहे. महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारं देशातील पहिलं राज्य आहे. आजपासून सोलापूर आणि लातूरमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता या ट्रायलचं उद्घाटन केलं. सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढीत दोन दात्यांना बोलावून त्यांचा प्लाझ्मा काढून घेण्यात आला. यासाठी गेल्या आठवड्यातच मशीन कार्यान्वित झाल्या आहेत.
Mission Begin Again 2 | महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा,पूर्वीचेच नियम कायम