एक्स्प्लोर
Advertisement
कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न
पालघर जिल्ह्यातील वाडा येथील एका कोरोना रुग्णाने विक्रमगड येथील रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा येथे राहणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगड येथील रिवेरा समर्पित कोरोना उपचार रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
वाडा येथील हा 38 वर्षीय रुग्ण कोरोनाबधित असून वाड्यातील पोशेरी उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तो अत्यवस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता कक्षात उपचाराची आवश्यकता होती. त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिव्हेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळच्या सुमारास लघुशंकेला जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना सांगत तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रिव्हेरा रुग्णालयाच्या गच्चीवर गेला.
तिथून त्याने रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उडी घेतली. तिथे तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला ही घटना समजल्यानंतर त्याने लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ही बाब सांगितली. रुग्णाने गच्चीवरुन उडी मारल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. तातडीच्या उपचारांमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर अधिक उपचारांसाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement