एक्स्प्लोर
सोलापुरात कॉन्स्टेबलची दादागिरी, मद्यधुंद अवस्थेत भर चौकात गोंधळ
सोलापूर : सोलापुरात राज्य उत्पादन शुल्कच्या कॉन्स्टेबलची दादागिरी पाहायला मिळाली. मद्यधुंद अवस्थेत या कर्मचाऱ्यानं सोलापुरातल्या एमप्लॉयमेंट चौकात गोंधळ घातला.
मलंग तांबोळी असं या कॉन्स्टेबलचं नाव असून, त्यानं चित्रीकरण करणाऱ्या स्थानिक वृत्तवाहिनीच्या जगन वाघमारे या कॅमेरामनलाही मारहाण केली. तसंच कॅमेरा हिसकावून घेत उत्पादन शुल्क कार्यलायात डांबून ठेवलं.
दरम्यान पत्रकार संघटनांनी आंदोलन छेडल्यानं मलंग तांबोळीवर तब्बल 24 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलंग तांबोळी हा मद्यधुंद अवस्थेत महिलांशी भांडत होता. याचं चित्रीकरण करत असताना तांबोळीनं जगन वाघमारे या कॅमेरामनला मारहाण केली.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement