एक्स्प्लोर
सांगलीत काँग्रेसच्या पंढरपुरातील माजी नगरसेवकाची हत्या
पंढरपूर : पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांची सांगलीत कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास सांगलीतील मिरज येथील भोसे फाट्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एका संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव भुईटे खून प्रकरणातील संशयीत आरोपी राजेंद्र भिंगे याच्याविरोधात मिरज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव भुईटे चार मित्रांसह मिरज येथे आजारी मित्राला भेटण्यासाठी गेले होते. काल रात्री परत येत असताना काही अज्ञातांनी गाडी अडवून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले मित्र आणि गाडीचा चालक घाबरून पळून गेले. भुईटे यांना नंतर तातडीने मिरज येथील विशाखा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सांगली पोलिसांनी आता भुईटे यांच्यासोबत असलेल्या गाडी चालकाची चौकशी सुरु केली असून त्यांसोबतच्या मित्रांचाही शोध सुरु केला आहे. नामदेव भुईटे हे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कट्टर समर्थक असून गेल्यावेळी सलग 5 वर्षे ते स्वीकृत सदस्य म्हणून काम करत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement