एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'त्या’वेळी मुख्यमंत्री वर्षावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा करणार
ज्या वेळेमध्ये पंढरपुरात पूजेला सुरुवात होते त्याचवेळी म्हणजे पहाटे दीड वाजता वर्षावरही मुख्यमंत्र्यांकडून सपत्निक विठ्ठलाची पूजा करण्यात येणार आहे.
मुंबई : मराठा संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करणार आहेत. आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेची परंपरा कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होत ‘मराठा क्रांती मोर्चा’ने पंढरपुरात आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला. मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महापूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला.
ज्या वेळेमध्ये पंढरपुरात पूजेला सुरुवात होते त्याचवेळी म्हणजे पहाटे दीड वाजता वर्षावरही मुख्यमंत्र्यांकडून सपत्निक विठ्ठलाची पूजा करण्यात येणार आहे.
‘पंढरपुरात 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण पूजा करण्यासाठी जाणार नाही, तर घरीच विठ्ठलाची पूजा करु,’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरी करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
माझ्यावर दगडफेक करुन आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
Advertisement