मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगडमध्ये मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता होण्याची शक्यता आहे.
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार CM Uddhav Thackeray visit alibaug Today after Nisara Cyclone मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/21210614/uddhav-web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघतील. मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास असेल. त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देतील.
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असतील. याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळ मागे अनेक पाऊलखुणा सोडून गेलं आहे. अनेकांचे संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
कसा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अलिबाग दौरा?- दुपारी 12.30 वाजता - मांडवा जेट्टी, येथे आगमन
- दुपारी 12.35 वाजता - मांडवा जेट्टी येथून अलिबाग येथे रवाना
- दुपारी 12.50 वाजता - थळ (अलिबाग) येथे पोहोचणार. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
- दुपारी 1.20 वाजता - थळ येथून अलिबाग येथे रवाना
- दुपारी 1.35 वाजता - अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी करणार
- दुपारी 1.40 वाजता - मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयकडे रवाना
- दुपारी 1.50 वाजता - निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीबाबत आढावा बेठक (जिल्हाधिकारी कार्यालय रायगड)
- दुपारी 2.50 वाजता - मांडवा जेट्टीकडे रवाना
- संबंधित बातम्या
- Nisarga | 'निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष, घरांची पडझड, पुण्यात दोघांचा मृत्यू
- Nisarga Cyclone | निसर्ग चक्रीवादळातून पालघर बचावलं, प्रशासनासह नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
- Nisarga | 'निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष, घरांची पडझड, पुण्यात दोघांचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)