एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलंय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मुंबई : 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधनं मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, आपल्याला शिस्तीची जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. काळजी घेणे अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले. 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, आपण काळजीपूर्वक सेवा सुविधा सुरु करतोय. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरु केलंय पण धोका टळलेला नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. पण आपल्याला संकटावर मात करायची आहे. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय असं नाही, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले. संकटातही सुमारे 16000 कोटींचे करार  कोरोनाच्या संकटातही सुमारे 16000 कोटींचे करार महाराष्ट्राने केले आहेत. उद्योग आल्यावर अर्थचक्राला गती आणि माझ्या भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. कोरोना एके कोरोना असे आपण करीत नाही आहोत. काही अटीतटी - शर्थी जटील न ठेवता आपण त्यांचे स्वागत करीत आहोत. उद्योजकांनो, महाराष्ट्रात या, तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करा, असं आवाहन त्यांनी केलं. लॉकडाऊन करायचे का?  मुख्यमंत्री म्हणाले की, आपणहून कोविडला बळी पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा, हात तोंडाला सारखे लावू नका. सुविधा, शिथिलता ह्या आरोग्यासाठी दिल्या आहेत, आजाराला बळी करण्यासाठी नाही. गरज नसताना बाहेर पडलात तर परत लॉकडाऊन करावे लागेल. आता प्रश्न तुम्हांला आहे, लॉकडाऊन करायचे का? असा सवाल त्यांनी केला. पावसाळा आलाय, काळजी घ्या ते पुढे म्हणाले की, शहरी भागात मी विशेष सांगतो, हे जे पावसाळ्याचे दिवस आहेत हे मलेरिया व डेंग्युचे दिवस आहेत. आपली यंत्रणा आज कोविड विरुद्धच्या युद्धात गुंग आहेत. व्यग्र आहेत. सर्वांना विनंती आहे, कुठेही पाणी साठू देऊ नका. डेंग्युच्या आळ्या ह्या अगदी एका बुचातील साठलेल्य पाण्यापासुन कोठेही होऊ शकतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे. नवीन अंकुर येतात, पालवी फुटते, हिरवे गालिचे पसरतात. पावसाळा एक नवीन जीवन घेऊन येतो. आणि या चांगल्या गोष्टींसह काही वाईटही घेऊन येतो. त्या दृष्टीने येणार्‍या नैसर्गिक आपत्ती जसे पूर, वादळ , साथीचे रोग घेऊन येतो. आपण त्या धरतीवरही तयारी करत आहोत, असं ते म्हणाले.  प्लाझ्मादान करा उद्या कदाचित प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे आपले राज्य पहिले ठरेल. प्लाझ्मा कोणाचा वापरू शकतो? कोरोना होऊन बरे झालेत, त्यांच्या शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत त्या रक्तगटानुरुप आपण वापरू शकतो. रक्तदानाप्रमाणे कोरोना बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णांना विनंती आहे प्लाझ्मादान करा. शेतकरी आणि डॉक्टरांना सलाम ते म्हणाले की, एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. योगायोगाने 1 तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्रीवसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्‍यांना, अन्नदात्याला सलाम करतो, धन्यवाद देतो. परवा 1 तारीख आहे, त्या दिवशी आपल्यासाठी लढणार्‍या सर्व डॉक्टर्स चा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो. आषाढीच्या वारीला जाणार मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्या वतीने मी आषाढीच्या वारीला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाहीतर अवघ्या देशासाठी, जगासाठी निरोगी आयुष्यासाठी साकडे घालणार आहे. वारकर्‍यांनो तुमचे आशीर्वाद पाठीशी राहु द्या, तुमचे आशीर्वाद घेऊन तुमचा प्रतिनिधी म्हणून विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जातोय.  मी वारी हेलिकॉप्टरमधुन एरियल फोटोग्राफीद्वारे केली. मला त्या अथांग अवकाशातुन सर्व विसरुन विठुमाऊलीच्या गजरात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या रुपातुन मला विठ्ठलाचे दर्शन झाले, विश्वरुप दिसले. वारकर्‍यांना सांगतो, नाईलाजास्तव वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागतोय, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. बोगस बियांणाच्या तक्रारी येत आहेत हे दुर्देवी. उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार. मी आषाढी वारीला पूजेसाठी जाणार. विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे. दहिहंडी उत्सव स्वताहून रद्द केला. ही खरी सामाजिक जाणीव. गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका मूर्ती लहान करण्याचा निर्णय कौतुकास्पद प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करणारं देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र असेल कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं लढणं हे आपल्या रक्तात आहे, आता रक्तदान करुन आपला लढाऊपणा सिद्ध करा रेमडेसिवीर आणि अन्य औषधं मोफत उपलब्ध करुन देणार चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे ज्येष्ठ डॉक्टरांनी काळजी घेऊन काम करावं पाऊस आला की नवचैतन्यासोबत काही समस्याही घेऊन येतो, मात्र आपली तयारी सुरु आहे या दिवसात अन्य रोगांचीही भीती आहे, त्यामुळं काळजी घ्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं दार उघडं, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीकाGulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटीलNitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Embed widget