एक्स्प्लोर

मायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे काम लेखक, साहित्यिक करत असतात असेही ते म्हणाले.

मुंबई  :  मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्त्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळाले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारात मराठी साहित्यिकांनी राष्ट्रीय स्तरावर आपले नाव केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले. 
 
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतीसाठींचे पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये किरण गुरव यांना ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.  तर प्रणव सखदेव यांना ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादबंरीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार, कसदार अशा साहित्यामध्ये मराठी साहित्यकृतींनी भर घालण्याचे महत्वाचे योगदान या दिले आहे. माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण जागर सुरु केला आहे. या प्रयत्नात पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींमधून मराठीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचीही चर्चा होत राहील. त्यादृष्टीने या साहित्यकृती राष्ट्रीय स्तरावर पोहोचणे महत्वाचे आहे. हे यश उदयोन्मुख लेखकांसाठी प्रेरणा देत राहील आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुरस्कार प्राप्त सर्वच साहित्यिकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी नातं सांगणाऱ्या, गावखेड्यातलं जीवन साहित्यातून मांडणाऱ्या, गाव व शहरातल्या बदलत्या संस्कृतीतलं द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या लेखकांना मिळालेला हा पुरस्कार ग्रामीण भागातील युवकांना लिहिण्यासाठी प्रेरीत करेल, असे पवार म्हमालेत.  यातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल, असेही अजित पवार म्हणाले. या मराठी भाषा, संस्कृती, साहित्यातली वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मराठी साहित्यिकांचा राष्ट्रीय स्तरावर होणारा गौरव हा प्रत्येक मराठी भाषाप्रेमीला सुखावणारा आहे. डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण साहित्यिक लिहते होतील. मराठी भाषा अधिक समृद्ध करतील, असा मला विश्वास आहे, असेही पवार म्हणाले. कोंकणी भाषेतील साहित्यासाठीचे पुरस्कारविजेते संजीव वेरेंकार, साहित्य अकादमी वार्षिक पुरस्कार विजेत्या सुमेधा कामत देसाय, बालसाहित्य पुरस्कारविजेत्या श्रद्धा गरड या कोकणी साहित्यिकांचे देखील अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :23 ऑगस्ट 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 23 ऑगस्ट 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 23 ऑगस्ट 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका; ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी, दुसरे स्थान पटकावले!
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका; ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी, दुसरे स्थान पटकावले!
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड!
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड!
Health : KEM रूग्णालयाच्या नेत्र विभागात 'मॉड्युलर शस्त्रक्रियागृह' सुरू! आता डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार अधिक सुकर, जाणून घ्या..
Health : KEM रूग्णालयाच्या नेत्र विभागात 'मॉड्युलर शस्त्रक्रियागृह' सुरू! आता डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार अधिक सुकर, जाणून घ्या..
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Embed widget