Sindhudurg District Bank Election Results : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत मोठे उलटफेर! सतीश सावंत, राजन तेलींचा पराभव
Sindhudurg District Bank Election Results Live updates : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Sindhudurg District Bank Election Results Live updates : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.
कणकवलीतून भाजपचे विठ्ठ्ल देसाई विजयी झाले. समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून हा निकाल जाहीर झाला. यात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व दिसत असलं तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. याठिकाणी वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी :
सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी
वैभववाडी गटातून भाजपचे दिलीप रावराणे यांचा विजय
मालवणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी
दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई यांचा विजय
कुडाळमधून काँग्रेसचे विद्याप्रसाद बांडेकर विजयी
कणकवलीमधून विठ्ठल देसाई विजयी
सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे अतुल काळसेकर विजयी
सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी
औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपचे गजानन गावडे विजयी
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नव्हतं.