एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींना माँ दुर्गेकडून शक्ती प्राप्त झाली आहे : मुख्यमंत्री

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचं गुणगाण करत त्यांना थेट वाघाची उपमा दिली आहे. नरेंद्र मोदी माँ दुर्गेचे भक्त असून त्यांना शक्ती प्राप्त झाल्याचंही फडणवीस म्हणाले. दुर्गा देवीचं वाहन वाघ असून आपले पंतप्रधान वाघासारखेच आहेत. भारताकडं कोणी डोळे वटारल्यावर त्यांच्याविरोधात कशी सर्जिकल स्ट्राईक करायची हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलचं माहित असल्याचं मुख्यमंत्री फडवणीस यावेळी म्हणाले. ते नागपुरातील कोराडीत स्वामी विवेकानंद मालती स्पेशियलीटी हॉस्पिटलच्या उदघाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावळ आदी उपस्थित होते.
आणखी वाचा























