एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटबंदीला समर्थन देणार नाही तो देशविरोधक : मुख्यमंत्री
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला जो पाठिंबा देईल, तो आर्थिक स्वातंत्र्य संग्रामाचा सेनानी बनेल, जो पाठिंबा देणार नाही तो देशाचा विरोधक असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज रत्नागिरीत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.
मात्र नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करेल तो देश विरोधक ठरेल, असं वक्तव्य खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहिर करुन आज 12 दिवस झाले. बँकेसमोर ग्राहकांच्या लागलेल्या रांगा आणि होणारी गैरसोय यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर देतांना हे विधान केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement