एक्स्प्लोर

Yugendra Pawar: सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल, तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? पण...; अजितदादांसाठी युगेंद्र पवारांची मन हेलावून टाकणारी पोस्ट

Yugendra Pawar: या अपघात प्रकरणावरून अपघात की घातपात याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, अशातच आज या घटनेला एक महिना झाल्यानंतर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट लिहली आहे.

बारामती : आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला (Ajit Pawar Death) एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात (Baramati Plane Crash) अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीजवळ विमान लँडिंगच्या तयारीत असताना विमान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणावरून अपघात की घातपात याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, अशातच आज या घटनेला एक महिना झाल्यानंतर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट लिहली आहे.

युगेंद्र पवारांनू सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलंय की, "प्रिय काका, आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला. आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल… आणि तुम्ही म्हणाल, "काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले. मग आपण बोलू…” पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ...? आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत."

"बाबा इतके भावूक झाले आहेत की, त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्यादिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, “दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…” आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत. काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही. यावर अजूनही विश्वास बसत नाही.
तुम्ही गेलात… काका तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात...काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे."

"मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही.
तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल. तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल. तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही… Miss you Kaka 💔 
तुमचाच,
युगेंद्र 🙏", अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yugendra Pawar (@yugendrapawarspeaks)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget