एक्स्प्लोर

Pratibha Dhanorkar: मला व्हिलन ठरवण्यात आलं, पण एक दिवस जनतेसमोर सत्य मांडणारच; प्रतिभा धानोरकरांचं 'त्या' वादावर मोठं वक्तव्य

Pratibha Dhanorkar: प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर मानलं जात आहे.

Pratibha Dhanorkar: चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) अलीकडे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून ऐनवेळी भाजपचा महापौर निवडून आला. या राजकीय उलथापालथीमागे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. धानोरकर आणि वड्डेटीवार यांच्यातील मतभेदांचा फायदा भाजपने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेसच्या हातून गेल्यानंतर पक्षावर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. "मला 'व्हिलन' ठरवण्यात आलं, पण एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच" असं चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी म्हटले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस (Congress) व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांसाठी एक 'स्नेहमिलन सोहळा' आयोजित केला होता आणि त्याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. 

अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत घेतलेल्या भेटीत निवडणुकीदरम्यान आणि सत्ता स्थापनेच्या वेळी प्रतिभा धानोरकर यांच्याकडून वारंवार झालेल्या अपमानाचा उल्लेख केला होता तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातीलच नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्यामागे खासदार धानोरकरच जबाबदार असल्याचं सूचित केलं होतं. आता प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर मानलं जात आहे. 

Pratibha Dhanorkar: मला 'व्हिलन' ठरवण्यात आलं, पण...

धानोरकर यांनी जारी केलेल्या प्रेस नोट मध्ये त्यांनी सत्ता स्थापनेच्या घटनाक्रमाचा आणि पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनांचाही उल्लेख केलाय. त्यांच्या मते राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास टाकला. मात्र, सत्ता स्थापन करताना काही 'सेक्युलर' म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात 'व्हिलन' ठरवण्यात आले असले, तरी वेळ आल्यावर मी माझी आपबिती जनतेसमोर नक्कीच मांडेन. 

Pratibha Dhanorkar: अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात

दिल्लीत काँग्रेस नेत्या खा. प्रियांका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात." अशी खंत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा 

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपुरात भाजपने चमत्कार घडवला, ठाकरेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget