एक्स्प्लोर
राज्यातल्या लोकसभा पोटनिवडणुका न लढण्यासाठी भाजपची शिवसेनेला गळ?
उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर दोघांमधली ही पहिलीच भेट होती.
मुंबई : नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर दोघांमधली ही पहिलीच भेट होती.
भाजपला सोडचिठ्ठी दिलेले खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया -भंडारा आणि खासदार चिंतामणी वनगा यांच्या निधनानंतर पालघर या रिकाम्या झालेल्या दोन लोकसभेच्या जागांसाठी काही महिन्यात पोटनिवडणूक लागतील.
या दोन्ही जागांवर शिवसेनेने भाजपविरोधात उमेदवार देऊ नये, यासाठी भाजपचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसंच येत्या काळात युतीच्या चर्चेसाठी दारं उघडी ठेवावीत याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर याबाबत शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
भाजपसाठी महाराष्ट्रातील या दोन पोटनिवडणुका का अटीतटीच्या?
लोकसभेच्या एकूण जागा आहेत 545. 2014 पासून भाजपची लोकसभेतील संख्या 282 वरुन घटून 273 वर आली आहे. लोकसभेत बहुमतासाठी 272 चा आकडा गरजेचा आहे. म्हणजेच भाजपकडे फक्त 1 जागा जास्त असून महाराष्ट्रातल्या दोन जागा गमावल्यास हा आकडा 271 वर येईल.
2014 पासून कशी झाली भाजपच्या लोकसभेच्या जागांमध्ये घट?
- निवडणुकीनंतर भाजपचे 5 खासदार पक्ष सोडून गेले.
- भाजपच्या 8 खासदारांच्या मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत 4 जागांवर विजय तर 4 पराभूत
- 2018 साली अजमेर आणि अलवर जागेवर पराभव
- 2017 साली गुरुदासपूर माधव पराभूत
- 2015 साली रतलामची जागा गमावली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement