एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हे तुमचं आमचं सर्वच सरकार आहे. शिक्षणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

CM Eknath Shinde on Teachers Day 2022 : आज शिक्षक दिन (Teachers Day)सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे तुमचं आमचं सर्वच सरकार आहे. शिक्षणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.  शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही.  शिक्षकांनी ज्या काही सूचना केल्या त्याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल. तसेच शिक्षकांचे पगार वेळेवर झाले पाहिजे त्यासाठी शिक्षण विभागाला आदेश देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, सुरुवातीला मी तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. शिक्षकांविषयी प्राचीन काळापासून आदर आहे. प्रत्येक जण यशस्वी जीवनाचा विचार करतो तेव्हा त्याला शिक्षकांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आईवडिलांनंतर शिक्षकांचं मोठं योगदान आपल्या आयुष्यात असतं. माझ्या आयुष्यात देखील शिक्षकांचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मध्ये मी शिकलो. आम्हाला रघुनाथ परब गुरुजी होते. आमचं नातं खूप भारी होतं, आम्ही गुरुजींची सेवा करायचो,  असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुंभार जसा मातीला आकार देतो तसेच शिक्षक आपल्या जीवनाला आकार देतात. त्यामुळं त्यांचं योगदान कधीही विसरण्यासारखं नसतं, असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.त्यांनी पुढं म्हटलं की, शिक्षकांच्या काही समस्या आहेत. आम्ही त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शिक्षकांनी ज्या काही सूचना केल्या त्याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल, असं ते म्हणाले. शैक्षणिक वाटचालीत महाराष्ट्र देशात अग्रणी राहिला आहे.  महाराष्ट्राला ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्यामुळं शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव नेहमी पुढं असतं. 

ते म्हणाले की, राज्यातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विद्यार्थी केंद्रीत विचार शिक्षणव्यवस्थेत आणला जात आहे. शिक्षण हे समाजनिर्मिती करणारं क्षेत्र आहे. आज एका क्लिकवर जग जोडलं गेलं आहे. असं असलं तरी गुगलसारखं तंत्रज्ञान तुम्हाला माहिती देऊ शकतं पण ज्ञान देऊ शकत नाही. ते फक्त तुम्हाला शिक्षकच देऊ शकतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरीता धोरणात्मक निर्णय

शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरीता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयांमध्ये विद्यार्थी केंद्रीत विचार असून संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवरुन काम करेल. यासाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण आनंददायी

राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात आपल्या राज्याने शिक्षणात मागील काही कालावधीपासून मोठी झेप घेतली असून प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांबद्दल आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवे प्रयोग विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागलं आहे, असे त्यांनी यावेळी सागितले.

आदर्श शाळांची संख्या वाढवूया

राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील काही उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करतांना मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद श्रीरामतांडा येथील शाळेमुळे 100 टक्के स्थलांतरण रोखल्याचे सांगतानाच पटसंख्येत वाढ झाली असे सांगितले. कोणत्याही सुट्टीविना शाळा 365 दिवस अविरत सुरु राहणारी चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा, तोरणमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा आजूबाजूच्या 29 पाड्यावरील 1600 मुलांसाठीची आदर्श निवासी शाळा झाली आहे, असे असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. आदर्श शाळा निर्माण करण्याचे खरे शिल्पकार शिक्षक असून अशा शाळांची संख्या वाढविण्यासाठी निर्धार करूया आणि उर्वरित सरकारी शाळांचा विकास करून त्यात भरीव पटसंख्या वाढवूया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

शिक्षकांची जागा कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही

ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा या राज्याला लाभली असून या परंपरेमुळं इथली शिक्षण व्यवस्था अधिक समृद्ध झाली आहे. शिक्षकांची जागा कुणीही किंवा कोणतंही तंत्रज्ञान भरु शकत नाही इतकं महत्त्वाचं स्थान त्यांचं आहे, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चांगल वाईट शोधण्यासाठी शिक्षकांनी अधिक सजगपणे प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शाळाबाह्य मुलांच्या समस्या, मध्यान्ह भोजन व व्यक्तिगत लाभाच्या इतर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यांच्या सुलभतेनं अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रीत करतानाच शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील असे महत्त्वाचे विषय, उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.   

कोरोनाकाळातील आव्हानाचं संधीत रुपांतर 

आई-वडीलांबरोबरच शिक्षकांचाही प्रत्येकाच्या जीवनात मोठा वाटा असतो. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील शिक्षणाचा आणि शिक्षक रघुनाथ परब यांच्याविषयीची आठवण सांगितली. कोरोनाकाळातील आव्हानाचं संधीत रुपांतर करुन राज्यात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिक्षकांचे वेतन खात्यात वेळेवर जमा व्हावे

शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देतानाच केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

Teachers Day : आज 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव, महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी

Teacher's Day 2022 : दरवर्षी 5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget